इंदूर Killed For Denying Sex : मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शनिवारी एका मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिच्या लिव्ह इन पार्टनरनं तिची कात्रीनं वार करून हत्या केली.
लिव्ह-इन पार्टनरची हत्या :हे प्रकरण इंदूरच्या रावजी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील आहे. शनिवारी येथे एका मुलीचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी गुना येथून आरोपी लिव्ह-इन पार्टनरला अटक केली. चौकशीत त्यानं खुनाची कबुली दिली आहे. हत्येमागील कारण जाणून पोलिसांनाही धक्का बसला.
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं खून : पोलिसांनी सांगितलं की, ही तरुणी तिच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत रावजी बाजार पोलिस स्टेशन परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. एका महिन्यापूर्वी या दोघांनी ही खोली भाड्यानं घेतली होती. घरमालकानं विचारल्यावर दोघांनीही लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं. घटनेच्या दिवशी तरुणानं दारू प्यायली होती. दारू पिल्यानंतर त्यानं तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा हट्ट धरला. मात्र तरुणीनं त्याचं ऐकलं नाही. त्यानंतर संतापलेल्या तरुणानं जवळच ठेवलेल्या कात्रीनं तिच्या मानेवर वार करून खून केला. घटनेनंतर त्यानं तिथून पळ काढला.
कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला :अतिरिक्त डीसीपी अभिनव विश्वकर्मा यांनी सांगितलं की, एका व्यक्तीनं या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तपास केला असता तरुणी तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. रावजी बाजार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं त्याची ओळख पटली. त्यानंतर एक टीम तयार करून आरोपीला गुना येथून अटक करण्यात आली. अतिरिक्त डीसीपीनी सांगितलं की, मृत तरुणीचे इंस्टाग्रामवर ५० हजार फॉलोअर्स होते. मात्र या घटनेनंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेच्या पथकासह पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हे वाचलंत का :
- दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या
- भाजपाला वोट दिलं म्हणून मुस्लिम महिलेला मारहाण, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- राजकीय वादातून मागास जातीच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला, साहित्यासह वाहनांची तोडफोड