चित्तूर (आंध्रप्रदेश) - आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले ग्रामीण मंडलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बकऱ्याचा बळी देण्यासाठी एका व्यक्तीने बकऱ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात रविवारी संक्रांती उत्सवादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलासपल्ले येथील इल्लम्मा मंदिरात मेंढ्या (ऐडका) कापताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला ( chopped up another man holding a sheep ) आहे.
जनावरांचा बळी देताना घडली घटना -
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेश (३५) याला मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मदनपल्ले ग्रामीण मंडळाच्या वलसपल्ले येथे परंपरेचा भाग म्हणून लोकांचा समूह जनावरांचा बळी देत असताना हा प्रकार घडला.
दारूच्या नशेत केली हत्या -