कोची - प्रेम आंधळ असते असे म्हणतात. प्रेमात लोक काहीही करतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. प्रेमात लोके एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही. अशीच एक पराक्रमी घटना केरळच्या पलक्कडमध्ये समोर आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र, एका तरुणाने आपल्या प्रियसीला तब्बल 10 वर्ष घरामध्येच लपवून ठेवलं. विशेष म्हणजे, घरातील सदस्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही.
नेमकं झाल काय तर, वर्ष 2010 मध्ये नेमरा पोलीस ठाणे क्षेत्रातील अयीरूर येथून एक तरुणी बेपत्ता झाली होती. तेव्हा ती 18 वर्षीय होती. संबधित तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तीचा पत्ता लागला नाही. 2010 पासून ते मार्च 2021 पर्यंत ती आपल्या प्रियकरासोबत त्याच्या घरातील एका खोलीत राहत होती. तोच तीची सर्व काळजी घ्यायचा. अन्न आणि इतर वस्तू देऊन तो खोली बाहेरून बंद करायचा. यात विशेष म्हणजे, तरुणीच्या आई-वडिलांचे घर ती राहत असलेल्या ठिकाणापासून काहीच अंतरावर होते. तसेच तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही या गोष्टीचा मागमूसही लागला नाही. सुरुवातीला त्याने विचार केला सर्वांना सांगावे आणि लग्न करावे. परंतु हातात पैशांची कमतरता आणि भीती यामुळे त्याने कुणालाच सांगितले नाही.