महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Udaipur Killing : उदयपूर टेलरच्या हत्येचे केले समर्थन.. आसाममध्ये एकास UAPA कायद्याखाली अटक - नुपूर शर्मा समर्थक हत्या

राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या टेलरच्या हत्येचे ( udaipur murder case ) समर्थन केल्याप्रकरणी आसाम राज्यात एका व्यक्तीस UAPA कायद्याखाली अटक करण्यात आली ( Man Arrested For Supporting Udaipur Killing ) आहे. समसूल लस्कर असे आरोपीचे नाव ( Assam Police Arrested Man Under UAPA ) आहे.

Man Arrested For Supporting Udaipur Killing
उदयपूर टेलरच्या हत्येचे केले समर्थन.. आसाममध्ये एकास UAPA कायद्याखाली अटक

By

Published : Jul 2, 2022, 10:20 AM IST

हैलाकांडी (आसाम) :आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात एका व्यक्तीला राजस्थानमधील उदयपूर येथील टेलरच्या निर्घृण हत्येला ( udaipur murder case ) पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी ( Man Arrested For Supporting Udaipur Killing ) सांगितले. कातलीचेरा भागातील रहिवासी असलेल्या समसुल लस्करला एका सोशल मीडिया वेबसाइटवर टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याने हत्येचे समर्थन केले होते, असे त्यांनी ( Assam Police Arrested Man Under UAPA ) सांगितले.

भाजयुमो नेत्याची तक्रार :लस्कर याला गुरुवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी हैलाकांडीचे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष मिलन दास यांनी पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांखाली आणि UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दास यांनी आपल्या तक्रारीत लस्कर याने अबू चौधरी नावाच्या एका व्यक्तीच्या पोस्टवर टिप्पणी केल्याचा आरोप केला. ज्याने कन्हैया लाल या शिंपीच्या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

गुन्हा एनआयएकडे वर्ग :रियाझ अख्तारी आणि घौस मोहम्मद अशी ओळख असलेल्या दोन व्यक्तींनी 28 जून रोजी कन्हैया लालचा उदयपूर येथील त्याच्या दुकानात क्लीव्हरने वार करून खून केला होता. इस्लामच्या अपमानाचा बदला घेत असल्याचे व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केले होते. त्यांना अटक करण्यात आली असून हा खटला राष्ट्रीय तपास यंत्रणा ( NIA ) कडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा :MHA On Udaipur Murder: उदयपूर हत्याकांडाची NIA कडून होणार चौकशी.. गृहमंत्रालयाचे आदेश.. दहशतवादी संबंध तपासणार

ABOUT THE AUTHOR

...view details