महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मला माझ्या बायकोपासून वाचवा, मुख्याध्यापकाची न्यायालयात विनंती, पहा सीसीटीव्ही फुटेज

पत्नीकडून छळ होत असल्याची तक्रार करत मुख्याध्यपक अजित सिंह यांनी ( Husbands Domestic Violence in Bhivadi ) न्यायासाठी भिवडी न्यायालयात दाद मागितली. त्यांनी स्वत:साठी सुरक्षा पुरवण्याची मागणी ( husband seek protection from wife ) केली. त्यावर न्यायालयाने त्यांच्या भल्यासाठी पोलिसांना आदेश दिले. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक अजित सिंग यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे पत्नीच्या मारहाणीचे व तोडफोडीचे पुरावे न्यायालयात सादर केले

पत्नीपासून संरक्षण देण्याची मुख्याध्यापक पतीची न्यायालयाकडे विनंती,  मार
पत्नीपासून संरक्षण देण्याची मुख्याध्यापक पतीची न्यायालयाकडे विनंती, मार

By

Published : May 24, 2022, 7:41 PM IST

Updated : May 24, 2022, 7:46 PM IST

भिवाडी ( जयपूर ) - पतीकडून पत्नीचा छळ होत असल्याच्या तुम्ही तक्रारी ऐकल्या असतील. पण, राजस्थानात पत्नीकडून मारहाण होत असल्याने पतीने थेट न्यायालयात धाव घेतली ( Domestic violence victim educator ) आहे. एवढेच नव्हे तर पत्नी मारहाण करत असलेले सीसीटीव्हीचे पुरावेही सादर केले ( Bhiwadi Man Plea Against Domestic Abuse ) आहेत. अजित सिंह असे पीडित मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पत्नीकडून छळ होत असल्याची तक्रार करत मुख्याध्यपक अजित सिंह यांनी ( Husbands Domestic Violence in Bhivadi ) न्यायासाठी भिवडी न्यायालयात दाद मागितली. त्यांनी स्वत:साठी सुरक्षा पुरवण्याची मागणी ( husband seek protection from wife ) केली. त्यावर न्यायालयाने त्यांच्या भल्यासाठी पोलिसांना आदेश दिले. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक अजित सिंग यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे पत्नीच्या मारहाणीचे व तोडफोडीचे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पत्नी रोज मारहाण करते. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. प्रथम सार्वजनिक लज्जेच्या भीतीने त्यांनी तक्रार केली नाही. परंतु पत्नीच्या वाढत्या अतिरेकाला कंटाळून कायद्याची मदत घेण्याचे ठरविले. या जोडप्याला 8 वर्षांचा मुलगाही आहे.

पत्नी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ

9 वर्षांपूर्वी झाले होते लग्न - अजित सिंह यांचा हरियाणातील सोनीपत येथील सुमनसोबत 9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीच्या दिवसात सर्व काही सुरळीत चालले. पण कालांतराने परिस्थिती बदलली. पत्नी सुमन यांनी पतीवर अत्याचार सुरू केले. (Man Files Plea Against Domestic Violence In Bhiwadi). पत्नी ही मुख्याध्यापक पतीला धावपळ करत मारहाण करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. आधी ती त्याच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला करते. मग ती पाण्याची बाटली फेकून फेकत आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान या दाम्पत्याचा धक्का बसलेला मुलगाही वडिलांच्या बचावासाठी उभा असल्याचे दिसत आहे. थोड्या वेळाने ते मूल तेथून पळून जाते. त्याच्या पत्नीनेही त्याच्यावर अनेकवेळा तव्याने हल्ला केल्याचे पीडित मुख्याध्यपकाचे म्हणणे आहे.

आणि खराब सीसीटीव्हीने हे रहस्य उघड केले!- पत्नीच्या मारहाणीत अनेकदा जखमी झाल्याचे अजित सिंह यांनी सांगितले. त्यांनी नेहमीच आपल्या वेदना लपविण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक शरमेच्या भीतीने त्यांनी इकडे-तिकडे उपचार करूनही वेळ काढली आहे. अनेकदा ती त्याला लोखंडी हत्यारांनी बेदम मारहाण करत असल्याचा आरोप आहे. घरात बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा अनेक दिवसांपासून बिघडलेला होता. एके दिवशी मुख्याध्यापकांनी चौकशी केली असता संपूर्ण घटनेची नोंद सीसीटीव्हीत कैद झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर अजित यांनी सीसीटीव्ही कॅमेरा ताब्यात घेऊन घटनेचे सर्व पुरावे तयार न्यायालयासमोर सादर केले.

मी शिक्षक आहे, सहन होत नाही -अजित सिंह म्हणाले, की मी शिक्षक आहे. शिक्षकाने महिलेवर हात उचलून कायदा हातात घेतला तर ते भारतीय संस्कृती विरोधात आहे. ही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत गेली तर त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला असता. फक्त हा सन्मान राखण्यासाठी त्यांनी पत्नीचा अतिरेक सहन केला. पत्नीच्या मारहाणीचा अजित सिंह यांच्या मनस्थितीवरही परिणाम झाला आहे. मानसिकदृष्ट्याही ते खूप कमकुवत झाले आहेत. परिस्थिती अशी आहे की ते अनेक गोष्टी सांगायला विसरतात. कधीकधी त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे नावही आठवत नाही.

1 महिन्यापासून अजित घरी गेले नाहीत -मारहाणीच्या भीतीने शिक्षक अजित 1 महिन्यापासून घरीही फिरकले नाहीत. लपूनछपून आयुष्य जगत आहेत. पत्नी सुमनला अमेरिकेत बसलेल्या भावाने भडकावल्याचा आरोप आहे. त्याच्या इशाऱ्यावरच ती आक्रमक होते, असा मुख्याध्यापक अजित यांचा दावा आहे. तूर्तास तो आपल्या नावावर फ्लॅट घेण्यासाठी आग्रही आहे. परिस्थिती बिकट असतानाही पत्नी आणि मुलाचा संपूर्ण खर्च उचलत आहेत.

सुरक्षेचे आदेश -मुख्याध्यापकांना सुरक्षा देण्याचे आदेश न्यायालयाकडून आले आहेत. न्यायालयाने सादर केलेल्या 202 अहवालाची पोलीस चौकशी करत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विपिन शर्मा यांनी सांगितले की, त्यांना न्यायालयाकडून 202 चा तपास करण्याचे आदेश मिळाले आहेत. सध्या पोलीस आरोपीचा जबाब घेऊन कारवाई पुढे करत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा-Maharashtra Live Breaking News; दहशतवादी फंडिग प्रकरण, आरोपीला ३ जून पर्यंतची पोलीस कोठडी

हेही वाचा-Pre-Monsoon Workload : राज्यातील तलाव, नदी-नाले, बंधारे गाळात; मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा

हेही वाचा-TIMEs Most Influential People : टाईम्सच्या जगातील 100 प्रभावी लोकांच्या यादीत भारताच्या 'या' व्यक्तींचा समावेश

Last Updated : May 24, 2022, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details