महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Man ends family with wood cutting machine : आर्थिक चणचणीतून लाकूड कापण्याच्या हत्याराने पत्नीसह दोन मुलांची हत्या, हत्येनंतर आत्महत्या - Man ends family with wood cutting machine

४१ वर्षीय व्यक्तीने पोर्टेबल इलेक्ट्रिक लाकूड कटरने पत्नी आणि दोन लहान मुलांची ( murder at Pozhichalur with wood cutter ) हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:चे जीवन संपवले. पल्लवरम येथील पोझिचलूर येथे ही घटना घडली आहे.

murder at Pozhichalur with wood cutter
murder at Pozhichalur with wood cutter

By

Published : May 28, 2022, 10:24 PM IST

चेन्नई - चेन्नईमध्ये हत्येची थरारक घटना समोर आली आहे. लाकूड कापण्याच्या यंत्राने ( portable electric wood cutter ) पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून एका व्यक्तीने जीवन संपविले.

४१ वर्षीय व्यक्तीने पोर्टेबल इलेक्ट्रिक लाकूड कटरने पत्नी आणि दोन लहान मुलांची ( murder at Pozhichalur with wood cutter ) हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:चे जीवन संपवले. पल्लवरम येथील पोझिचलूर येथे ही घटना घडली आहे. शेजाऱ्यांनी संशयावरून घरावर जाऊन पाहिले. तेव्हा कुटुंबातील चौघेजण रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर ही भीषण हत्या समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शंकरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी केली. या भीषण घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आर्थिक अडचणीमुळे गुन्हा-एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे ( suicided due to financial distress ) या व्यक्तीने हा गुन्हा केल्याचे उघड आहे. प्रकाश (41), त्याची पत्नी गायत्री आणि 13 आणि नऊ वर्षांची दोन मुले अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी क्रोमपेटच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details