महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Selfie With Cobra : कोब्रासोबत सेल्फी घेणे बेतले जीवावर, डंख मारल्याने तरुणाने गमावला जीव - महादेवाची पोज देत घ्यायचा होता सेल्फी

नेल्लोर जिल्ह्यातील कंदकुर येथे कोब्रा नागासोबत सेल्फी घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मणिकांता रेड्डी असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याला महादेवासारकी पोज देत गळ्यात कोब्रा घालून सेल्फी घ्यायचा होता. मात्र यावेळी नागाने त्याला डंख मारल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सेल्फी घेताना तरुणाईने सावधानता बाळगण्याचे आवाहन ईटीव्ही भारतच्या वतीने करण्यात येत आहे.

Man Died While Taking Selfie With Cobra
कोब्राने डंख मारलेल्याने मृत झालेला मणिकांता रेड्डी

By

Published : Jan 25, 2023, 8:24 PM IST

नेल्लोर - कोब्रा नागासोबत सेल्फी घेणे तरुणाच्या जीवावर बेतल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील मंगलमपाडू येथील कंदकुरमध्ये घडली आहे. मणिकांता रेड्डी असे त्या कोब्राने डंख मारल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मणिकांताला महादेवासारखी पोज देत सेल्फी घ्यायचा होता. त्यामुळे त्याने कोब्रा नाग आपल्या खांद्यावर लपेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सापाने त्याच्या हातावर डंख मारल्याने मणिकांताला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मणिकांता रेड्डी

महादेवाची पोज देत घ्यायचा होता सेल्फी :आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदकुर येथील मणिकांता रेड्डी हा ज्युसचे दुकान चालवतो. गावात एक साप पकडणारा आला होता. त्यामुळे मणिकांताला गळ्यात साप घालुन महादेवासारखी पोज देत सेल्फी काढायचा होता. त्याने गळ्यात कोब्रा घेऊन काही फोटोही घेतले. त्यानंतर त्याला गळ्यात कोब्रा घेऊन महादेवासारखी पोज द्यायची होती. मणिकांता त्यासाठी तयारही झाला होता. मात्र महादेवासारखी पोज देताना घात झाला. कोब्राने त्याला डंख मारल्याने मणिकांताला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

साप पकडणारा व्यक्ती

कोब्राच्या डंखाने रस्त्यातच झाला मृत्यू :मणिकांताला साप पकडणाऱ्या व्यक्तीने या कोब्राचे विषारी दात काढलेले असल्याची माहिती दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मणिकांता हा कोब्रासोबत सेल्फी घेण्यास उत्सुक झाला. त्याने महादेवाची पोज देत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोब्राने त्याला डंख मारल्याने मणिकांता गंभीर झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला :कंदकुर येथील मणिकांता रेड्डी हा तरुण फळांचे ज्युस विकण्याचे काम करतो. त्याच्या दुकानापुढे रात्री 9 वाजता साप पकडणारा व्यक्ती आला होता. यावेळी मणिकांताला महादेवाची पोज देत सेल्फी काढायचा होता. मात्र यावेळी त्याला कोब्राने डंख मारल्याने तो गंभीर झाला. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या तरुणाने दिली.

सेल्फीचा उत्साह बेतू शकतो जीवावर :सेल्फी, हे नाव ऐकताच तरुणाईला विशेष अनुभूती येते. विविध पोजमध्ये फोटो घेण्यासाठी तरुणाईत स्पर्धाच लागते. या सेल्फीला सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्समुळे तरुणाईला समाधान मिळते. त्यामुळे सेल्फीसाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालत आहेत. आतापर्यंत अनेकांनी सेल्फी घेताना आपला जीव गमावला आहे. करकुंद येथील मणिकांतानेही असाच सेल्फीसाठी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सेल्फी घेताना सावधानता बाळगण्याचे आवाहन ईटीव्ही भारतकडून तरुणाईला करण्यात येत आहे.

हेही वाचा - Honor Of ST Driver : 25 वर्षे विना अपघात सेवा केलेल्या एसटी चालकांना मिळणार 25 हजाराचा धनादेश

ABOUT THE AUTHOR

...view details