महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonipat Crime News : भेसळयुक्त गव्हाचे पीठ खाल्ल्याने एकाचा मृत्यू, अनेकांची तब्बेत बिघडली - सोनीपतमध्ये गव्हाचे पीठ खाल्ल्याने मृत्यू

सोनीपतमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरात्रीच्या उपवासात गव्हाचे पीठ खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या गव्हाच्या पिठात भेसळ असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरु असून तपासानंतरच प्रकरण समोर येईल.

man died after eating adulterated wheat flour
भेसळयुक्त गव्हाचे पीठ खाल्ल्याने मृत्यू

By

Published : Mar 26, 2023, 8:40 AM IST

सोनीपत (हरियाणा) : हरियाणाच्या सोनीपतमध्ये भेसळयुक्त गव्हाचे पीठ खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा सोनीपतमधील अहमदपूरचा रहिवासी असून त्याचे नाव राजेश असल्याचे सांगण्यात येत आहे. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेकडो लोकांनी विषारी आणि भेसळयुक्त गव्हाच्या पीठाचे सेवन केल्याचे स्थानिकांचे मत आहे. आरोप आहे की, गव्हाचे पीठ खाल्ल्यानंतरच मृताची प्रकृती खालावली होती. पीठ खाल्यानंतर प्रकृती खालावल्याने या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह सोनीपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला असून तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मृतदेहाचे पोस्टमार्टम होणार : सोनीपतमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गव्हाचे पीठ खाल्ल्याने शेकडो लोकांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर सोनीपत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांच्या उड्डाण पथकाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत कारवाई केली. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आज पुन्हा एकदा सोनपतमध्ये गव्हाचे पीठ चर्चेत आले, कारण एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासादरम्यान हे गव्हाचे पीठ खाल्ल्याचा आरोप केला आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच राजेशचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होईल. हरियाणासोबतच अनेक राज्यांमध्ये गव्हाचे पीठ खाल्ल्यानंतर आजारी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात गव्हाचे पीठ खाल्ल्याने शेकडो लोक आजारी पडले आहेत.

मृताच्या कुटुंबियांचा निष्काळजीपणाचा आरोप : मृताच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राजेशच्या मृत्यूची माहिती मिळताच सोनीपत सेक्टर 27 पोलिस स्टेशन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रकरणाची माहिती देताना पोलीस स्टेशनचे प्रभारी रविंदर कुमार म्हणाले की, 'अहमदपूरचा रहिवासी राजेशचा गव्हाचे पीठ खाल्ल्याने मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमच्याकडे तक्रार देण्यात आली असून त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफीही करण्यात येणार असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही'. पिठाचे नमुनेही विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :V Muraleedharan Praised Modi : मंत्र्याने मोदींची स्तुती करताच विद्यार्थ्यांनी चालू केली घोषणाबाजी, केरळच्या विद्यापीठातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details