गुवाहाटी - अवाढव्य हत्ती(Elephant) पिसाळला तर काय होऊ शकते, याची कल्पना करूनच घाम फुटतो. असाच एक हत्ती आसामधील जिल्ह्यातील तामरहाटमध्ये पिसाळला (Wild Elephant in Tamarhat in Assam) आहे. तामरहाट येथे शनिवारी एका जंगली हत्तीने 30 वर्षीय व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उभे राहिले आहेत. ही घटना ग्रामस्थानी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओमध्ये, एक जंगली हत्ती माणसाचा पाठलाग करत असल्याचे दिसून येत आहे.