महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO- लग्नानंतर नववधुला खाद्यांवर उचलून नेत वर नदी पार!

बिहारमध्ये काही ठिकाणी पुराने कहर केला आहे. अशा स्थितीत वधु-वरांसह कुटुंबियांनी नावेतून प्रवास केला. पण, त्यापुढचा प्रवास त्यांना पायीच करावा लागणार होता. पुढे काय घडले, हे वाचा.

वर नववधुला खाद्यांवर उचलून नेत नदी पार
वर नववधुला खाद्यांवर उचलून नेत नदी पार

By

Published : Jun 29, 2021, 3:04 PM IST

पाटणा - जेजुरीत खंडोबाच्या मंदिरात वर अनेकदा नववधुला उचलून नेत पायऱ्या चढत असल्याचे व्हिडिओ पाहिले असेल. बिहारमध्ये वराला असाच काहीसा प्रकार करावा लागला आहे. मात्र, परंपरा म्हणून नव्हे तर चक्क नदी ओलांडण्यासाठी!

लग्न झाल्यानंतर सातजन्माला सोबत देण्याची वधू-वराने फेऱ्या मारल्यानंतर पुढे काही वाढून ठेवले आहे, याची त्यांना कदाचित कल्पनाही नसेल. नावेतून उतरल्यानंतर त्यांना नदी ओलांडावी लागणार होती. वराने वधुला खांद्यावर घेत नदीमधून वाट काढण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये वऱ्हाडामधील काही महिला आणि लहान मुलेही दिसत आहेत.

हेही वाचा-इंधनाचे दर वाढत असल्याने थेट पेट्रोलियम मंत्र्यांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल!

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

बिहारमध्ये काही ठिकाणी पुराने कहर केला आहे. अशा स्थितीत वधु-वरांसह कुटुंबियांनी नावेतून प्रवास केला. पण, त्यापुढचा प्रवास त्यांना पायीच करावा लागणार होता. शेवटी वराने वधुला खांद्यावर घेऊन चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

वर नववधुला खाद्यांवर उचलून नेत नदी पार

हेही वाचा-कोविन यंत्रणा घेण्याची ५० हून अधिक देशांनी तयारी; भारत जाहीर करणार ओपन सोर्स

दरम्यान, बिहारमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी ऑगस्टमध्ये महापुराचा एकूण 74 लाख लोकांना फटका बसला होता. तर 23 जणांचा मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details