महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Man Burned Girlfriend Bike : रागाच्या भरात युवकाने पेटवली प्रेयसीची दुचाकी! 'हे' आहे कारण - Man Burned Girlfriend Bike in Bengaluru

प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीची दुचाकी जाळल्याचा (BF Burn GF Bike) प्रकार बंगळुरु येथे समोर आला आहे. सध्या या बातमीची चर्चा सर्वत्र (Man Burned Girlfriend Bike) आहे. प्रियकर ड्रग घेत असल्याची तक्रार प्रेयसीने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर प्रियकराला अटक करण्यात (Lover Arrested) आली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने रागाच्या भरात तिची दुचाकी जाळली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 15, 2022, 5:35 PM IST

बेंगळुरू: बेंगळुरू मध्ये एका युवकाच्या प्रेयसीने तो वापरत असलेल्या ड्रग्जची माहिती पोलिसांना दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिची दुचाकी पेटवून दिली. (Man Burned Girlfriend Bike in Bengaluru). आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, 12 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर युवक घटनास्थळावरून फरार झाला होता. (Burned Girlfriend Bike after released from jail).

जामिनावर बाहेर आल्यानंतर पेटवली दुचाकी : आरोपी युवक आणि युवतीचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तो अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतला होता. हे कळल्यावर युवतीने त्याला बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बदलला नाही. त्यामुळे तिने शेवटी पोलिसांना कळवले. त्यानंतर माडीवाला पोलिसांनी युवकाला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. आठ महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आलेल्या युवकाला आपल्या अटकेला आपली प्रेयसीच जबाबदार असल्याचे समजल्यानंतर त्याने तिच्या घरी जाऊन तिची स्कूटर पेटवून दिली. हालसूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details