महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'त्याने' दाखविला साप, मिळाली लगेच वाट! - म्हैसूर पोलीस

लॉकडाऊनमधील नियमानुसार वाहनांना केवळ आपत्कालीन स्थितीत परवानगी आहे. मात्र, जंगलात सापाला सोडून देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांना वाट द्यावी लागली.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'त्याने' दाखविला साप
Man brings snake during police checking

By

Published : May 11, 2021, 8:44 PM IST

बंगळुरू - लॉकडाऊन असताना विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिल्याचे व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिले असण्याची शक्यता आहे. मात्र, म्हैसुरमधील पोलिसांची दुचाकीस्वाराला अडविताच बोबडी वळण्याची वेळ आली. कारण, दुचाकीस्वाराने अडविल्यानंतर थेट पोलिसांना काचेच्या बरणीमधील साप दाखविला. हा प्रकार पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना लॉकडाऊनमध्ये वाहनचालकांची तपासणी करावी लागत आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी म्हैसुरमधील पोलिसांना एका दुचाकीस्वाराला अडवून चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कुठे जात असल्याचे विचारल्यानंतर जंगलात जात असल्याचे उत्तर त्या व्यक्तीने दिले. जंगलात का जात आहेस, असे विचारताच दुचाकीस्वाराने काचेच्या बरणीमधील साप दाखविला. पोलिसांनी कोणताही अडथळा न आणथा तत्काळ दुचाकीस्वारासाठी वाट मोकळी केली.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'त्याने' दाखविला साप

हेही वाचा-गोवा : ऑक्सिजनअभावी २६ जणांचा मृत्यू ? उच्च न्यायालयाने चौकशी करण्याची सरकारची मागणी

लॉकडाऊनमध्ये आपात्कालीन स्थितीतच वाहनांना परवानगी-

लॉकडाऊनमधील नियमानुसार वाहनांना केवळ आपत्कालीन स्थितीत परवानगी आहे. मात्र, जंगलात सापाला सोडून देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांना वाट द्यावी लागली. स्नेक कुमार असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो सर्पमित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-कोरोना लशीचा फॉर्म्यूला सार्वजनिक करावा; अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

कर्नाटकमध्ये १० मे ते २४ मे पर्यंत लॉकडाऊन

कर्नाटकमध्ये १० मे रोजी सकाळी ६ ते २४ मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी केली आहे. जनता कर्फ्यू लागू करूनही लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबविण्याची कडक कार्यवाही करणे अटळ झाल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details