जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात एका मदरसा शिक्षकाला पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना सुरक्षा आस्थापनांशी संबंधित माहिती दिल्याप्रकरणी अटक ( Maulvi Arrested In Kishtwar ) करण्यात आली आहे ( Madrasa teachers arrested in Kishtwar ). अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अब्दुल वाहिद Qari Abdul Waheed (२५), जो मौलवी म्हणून काम करत होता, त्याच्यावर बेकायदेशीर पाकिस्तानला माहिती दिल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहिदवर विविध सुरक्षा एजन्सींच्या नजर :11 आरआर, सीआरपीएफ 52 बीएन तसेच किश्तवाड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मैलवीला बेड्या ठोकल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूल भागात राहणारा वाहिद हा त्याची पत्नीसह, सात महिन्यांच्या मुलासोबत दादपेठ गावातील एका मदरशात राहत होता. लष्करी गुप्तचरांनी सुरुवातीला सीमेपलीकडून माहिती देत असलेल्या संशयिताच्या उपस्थितीबद्दल माहिती गोळा केली होती. वाहिदवर विविध सुरक्षा एजन्सींच्या नजर होती.