नई दिल्लीः उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर परिसरात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ( Rape With Minor In Delhi ) पीडित तरुणी आणि आरोपी वेगवेगळ्या समुदायातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत रविवारी पीडित मुलीच्या आईने माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, इमारतीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने मुलीला फूस लावून आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
Rape With Minor In Delhi: सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; तरुणावर गुन्हा दाखल - Rape With Minor In Delhi
दिल्लीतील दयालपूर परिसरात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी आणि आरोपी वेगवेगळ्या समुदायातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
दयालपुर पोलीस ठाणे
या घटनेबाबत मुलीने आईला माहिती देताच तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.