कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Chief Minister Mamata Banerjee ) यांनी सोमवारी सांगितले की, कोणीही चुकीच्या कामात दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शालेय सेवा आयोग (एसएससी) घोटाळ्यात ( SSC Tecruitment Scam ) अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) त्यांचे कॅबिनेट सहकारी पार्थ चॅटर्जी ( Partha Chatterjee ) यांना अटक केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. येथे राज्य सरकारच्या एका पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात सुरू केलेल्या "दुर्भावनापूर्ण मोहिमेबद्दल" विरोधकांवर टीका केली. आपण भ्रष्टाचाराचे समर्थन करत नसल्याचे त्या म्हणाल्या.
न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास - “आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कालमर्यादा असावी ज्यामध्ये सत्य आणि न्यायालयाचा निर्णय बाहेर यावा. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पक्ष कारवाईही करेल. पण, मी माझ्याविरुद्ध चालवलेल्या द्वेषपूर्ण मोहिमेवर टीका करते. भारतीय जनता पार्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॅनर्जी अर्पिता मुखर्जी यांच्याशी बोलताना दिसत आहेत, ज्यांच्या घरातून 22 कोटी रुपये रोख सापडले आहेत. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही.