महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी 24 वर्षांनंतर देतील अजमेरच्या दर्ग्याला भेट, 1999 मध्ये रेल्वेमंत्री बनण्यापूर्वी घेतलं होतं दर्शन - ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) 6 डिसेंबरला किशनगड हेलिपॅडवर उतरतील. यानंतर त्या थेट सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्यावर जाणार आहेत. ममता बॅनर्जी 24 वर्षांनंतर अजमेर दर्ग्यात येत आहेत. (Mamata Banerjee to visit Ajmer dargah). या आधी त्या रेल्वे मंत्री बनण्यापूर्वी 1999 मध्ये पहिल्यांदा अजमेर ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यात आल्या होत्या.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 3, 2022, 9:16 PM IST

अजमेर (राजस्थान) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) 6 डिसेंबर रोजी अजमेर येथील जगप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देणार आहेत. (Mamata Banerjee to visit Ajmer dargah). ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा या दर्ग्यात येत आहेत. या आधी रेल्वेमंत्री होण्यापूर्वी त्या दर्ग्यात आल्या होत्या. दर्गाह झियारत नंतर ममता बॅनर्जी यांचा पुष्करमधील पवित्र तलावाची पूजा आणि जगत्पिता ब्रह्मा मंदिरात दर्शनाचा कार्यक्रम आहे.

रेल्वेमंत्री बनण्यापूर्वी घेतलं होतं दर्शन : ममता बॅनर्जी 6 डिसेंबरला किशनगड हेलिपॅडवर उतरतील. यानंतर त्या थेट सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्यावर जाणार आहेत. ममता बॅनर्जी 24 वर्षांनंतर अजमेर दर्ग्यात येत आहेत. दर्ग्याचे खादिम सय्यद मुकाद्दस मोइनी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होण्यापूर्वी 1999 मध्ये पहिल्यांदा अजमेर ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यात आल्या होत्या. मोइनी सांगतात की, त्या वेळी त्यांनी राजकारणात यशस्वी होऊन देश आणि राज्याची सेवा करायची संधी मिळावी, अशी प्रार्थना करायला सांगितले होते. दर्ग्यात दर्शन घेतल्यावर अवघ्या 4 महिन्यांतच त्या देशाच्या रेल्वे मंत्री झाल्या होत्या.

ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर गाढ विश्वास :मोइनी यांनी पुढे सांगितले की, जियारतनंतर तत्कालीन खासदार ममता बॅनर्जी यांना स्कार्फने झाकलेला तब्रुक (प्रसाद) देण्यात आला होता. 1999 मध्ये दर्ग्याच्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून निजाम गेट, दर्ग्याच्या मुख्य गेटवर एक फोटो देखील काढण्यात आला होता. तो फोटो आजही माझ्याकडे आहे. यात ममतासोबत मी आणि माझा भाऊ सय्यद हिमायतही उपस्थित होतो. खादिम मुकद्दस मोइनी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांचा ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर गाढ विश्वास आहे. त्या प्रत्येक वार्षिक उर्सला ख्वाजा गरीब नवाज यांना चादर आणि संदेश पाठवतात.

ABOUT THE AUTHOR

...view details