महाराष्ट्र

maharashtra

Mamata Banerjee speaks to NCP Chief : ममता बॅनर्जी यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा; नवाब मलिक यांना दर्शविला पाठिंबा

By

Published : Feb 23, 2022, 8:06 PM IST

Updated : Feb 23, 2022, 8:15 PM IST

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमुल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि मंत्री नवाब मलिक यांनी ( Maharashtra Minister Nawab Malik ) पाठिंबा दर्शविला आहे.

ममता बॅनर्जी शरद पवार
ममता बॅनर्जी शरद पवार

नवी दिल्ली-पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमुल पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि मंत्री नवाब मलिक यांनी ( Maharashtra Minister Nawab Malik ) पाठिंबा दर्शविला आहे.

मनी लाँड्रींग प्रकरणी ( money laundering case ) राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक ( Minister Nawab Malik arrested by ED ) करण्यात आली आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भाजपकडून ईडीसारख्या तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप होतो. अशातच नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर तृणमुलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी फोनद्वारे केलेल्या चर्चेत राष्ट्रवादी आणि नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शविला आहे.

ममता बॅनर्जींनी डिसेंबरमध्ये शरद पवारांची घेतली होती भेट

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीयांनी मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar ) यांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. देशात सध्या जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी एक सक्षम पर्याय देण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले होते.

हेही वाचा-Mamata Banerjee in Goa : गोव्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर ही दिली होती प्रतिक्रिया

ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, देशात जी फॅसिझमची परिस्थिती सुरू आहे. त्याच्या विरोधात एक पर्यायी आघाडी तयार केली पाहिजे. शरद पवार हे मोस्ट सिनिअर लीडर आहेत, त्यांच्यासोबत मी काम केले आहे, म्हणून मी त्यांच्याशी पोलिटिकल कर्टसी आणि चर्चा करायला आली आहे. जे लढतात अशांचा एक सक्षम पर्याय हवा आहे. जर कुणी लढत नाही तर आम्ही काय करू? , असा टोला काँग्रेसला लगावला. तिसऱ्या आघाडीचा लीडर कोण यावर त्यांनी चर्चा करून ठरवू असे म्हणाल्या.

हेही वाचा-2024 ची निवडणूक देशासाठी निर्णायक, मोदींचा पराभव न झाल्यास लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण

मनी लाँड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक

मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. आज पहाटेच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले होते. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी कार्यालयात घेऊन आले होते. चौकशीनंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

Last Updated : Feb 23, 2022, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details