कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. रविवारपासून ममता यांनी व्हीलचेअरवरुन आपल्या प्रचाराला सुरवात केली. कोलकातामधील हजारात त्यांनी सभेला संबोधित केले. जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात त्यांना भाजपाला आव्हान दिले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि इतर तृणमूलचे नेते उपस्थित होते.
ममता बॅनर्जी यांना रविवारी व्हीलचेअरवर बसून प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा सामना केला आहे. मात्र, कधीच झुकले नाही. मला प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला आहे. मी व्हीलचेअरवर बसून प्रचार करणार आहे. जखमी जखमी वाघीणजास्त घातक असते, या शब्दात त्यांनी भाजपाला आव्हान दिले.
मायभूमीची रक्षा करत आलो आहोत आणि येथून पुढेही करत राहणार. कधीच वाकणार नाही. दुखापतीचा मला आताही त्रास होत आहे. मात्र, माझे दु:ख हे तुमच्या दु:खापेक्षा कमी आहे, असे त्या म्हणाल्या.
दीदींच्या पायला दुखापत -