महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mallikarjun Kharge: मणी शंकरांची पुनरावृत्ती, खरगेंकडून मोदींची रावणाशी तुलना - Kharge speaking at a rally in Ahmedabad

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ दोन दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलेच वातावरण तापलेले आहे. सर्वच पक्षांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया सुरू आहेत. (Mallikarjun Kharge) यातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना करणारे विधान केले आहे. त्यावरून आता भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.

Mallikarjun Kharge
खरगे यांची मोदी यांच्यावर टीका

By

Published : Nov 29, 2022, 5:34 PM IST

Updated : Nov 29, 2022, 6:59 PM IST

अहमदाबाद (गुजरात) - मलिल्काकर्जुन खरगे सोमवारी अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खरगे यांनी मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. “भाजपा सगळीकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करते. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकामध्ये मोदींच्या प्रतिमेचा वापर केला जातो. आम्ही तुमचा चेहरा कितीवेळा पाहावा. मोदी १०० डोकी असलेले रावण आहेत का?” असे विधान खरगे यांनी केले आहे. त्यावरून आता देशभर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, (दि. 7 डिसेंबर 2017)रोजी दिल्लीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याची टिका केली होती. त्यावरून देशात चांगलेच वातावरण तापले होते. त्याच पद्धतीचे खरगे यांचे हे रावणाशी तुलना करणारे विधान आहे असे म्हणत आता आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वार-प्रतिवार सुरू आहेत.

मणी शंकरांची पुनरावृत्ती, खरगेंकडून मोदींची रावणाशी तुलना

भाजपची प्रतिक्रिया - खरगे यांच्या या विधानानंतर भाजपा चांगलेच आक्रमक झाले आहे. “काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटले आहे. मुळचे गुजरातचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरलेले हे शब्द योग्य नाहीत. हे विधान निषेधार्ह असून यातून काँग्रेसची मानसिकता दिसते. हा फक्त मोदी यांचाच नव्हे, तर प्रत्येक गुजराती नागरिकाचा अपमान आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 29, 2022, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details