नवी दिल्ली - काँग्रेसकडून राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्षांकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद निवृत्त झाल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपद रिक्त होणार आहे. त्यामुळे खर्गे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
'हे' असणार राज्यसभेचे नवे विरोधी पक्षनेते; काँग्रेसने केली अध्यक्षांकडे शिफारस - राज्यसभा विरोधी पक्षनेते बातमी
काँग्रेसकडून राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्षांकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
मलिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. याआधी त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी याआधी काँग्रेसचे गटनेते म्हणून सभागृहात काम पाहिले आहे. ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. गुलाम नबी आझाद निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी खर्गेंची शिफारस करण्यात आली आहे. नुकतेच राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचे आणि देशसेवेचे कौतुक केले. काँग्रेस पक्षानेच शिफारस केली असल्याने खर्गे यांच्या निवडीची फक्त औपचारिकता राहिली आहे.