पाटणाINDIA Alliance Convenor : विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीनं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. ते यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी आघाडीचं नेतृत्व करतील. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
नितीश कुमार यांचा नकार : आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी याला नकार दिला. इंडिया आघाडीच्या आभासी बैठकीत काँग्रेसनं त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र नितीश कुमार यांनी समन्वयक पद काँग्रेसकडेच असावं, असं सांगितलं. या बैठकीला आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, एमके स्टॅलिन, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल आणि डीके राजा यांच्यासह 14 पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या आभासी बैठकीत सहभागी झाले नाहीत.
अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. नितीश कुमार यांना समन्वयक करण्याचा प्रस्ताव इंडिया आघाडीत होता. मात्र त्यांनी याला नकार दिला. त्यांनी अद्याप कोणतीही संमती दिलेली नाही. काँग्रेसनं नेतृत्व करावं, असं ते म्हणाले. आता सर्व मुद्द्यांवर पक्षांतर्गत चर्चा होईल. - संजय झा, जेडीयू नेते आणि मंत्री, बिहार सरकार.