पाटणा- बिहारमधील परीक्षांचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डाची परीक्षेच्या (बीएसईबी) गुणपत्रिकेवर मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचा फोटो झळकला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही गुणपत्रिका मुळात एसटीईटीच्या परीक्षेचा विद्यार्थी ऋषीकेश कुमार याची आहे.
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी एसटीईटी परीक्षेच्या निकालावरून बिहार सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते रितू जैस्वाल यांचे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले, की बिहारच्या ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेच्या गुणपत्रिकेवर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापून आला होता. आता मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनदेखील एसटीईटी पास झाली आहे. नितीश (बिहारचे मुख्यमंत्री) हे प्रत्येक परीक्षेच्यावेळी कोट्यवधी तरुणांचे भविष्य खराब करत असल्याचे जैस्वाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लाटेत दिल्ली सरकारकडून गरजेपेक्षा चारपटीने ऑक्सिजनची मागणी - अहवाल