श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये एक आयईडी स्फोटके लावलेली दुचाकी आढळून आली. जिल्ह्याच्या मेंढार भागामध्ये ही दुचाकी मिळाली. यावर तब्बल २.४ किलो आयईडी बसवण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मोठा अनर्थ टळला..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गोहलाड रीलन-मेंढार रोडवर पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी रात्री दहाच्या सुमारास ही दुचाकी पोलिसांना दिसून आली. तपासणी केली असता, यावर विस्फोटके लावलेली आढळली. यानंतर या स्फोटकांना रविवारी दुपारी एकच्या सुमारास नियंत्रित वातावरणात नष्ट करण्यात आले. पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अंगराल यांनी याबाबत माहिती दिली.