शिमला- हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात एक हृदयाचे ठोके वाढवणारी अपघाताची घटना घडली. येथील बोहराड परिसरातील एका घाटात घडलेल्या अपघातामध्ये बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अनियंत्रित झालेली बस घाटातून दरीत कोसळण्याची घटना टळली, मात्र, अपघातग्रस्त कठड्यावर लटकत राहिल्याचा प्रकार घडला. यावेळी वाहन चालकाने सतर्कता दाखवत ब्रेक दाबून बस खाली कोसळण्यापासून रोखून धरली त्यानंतर सर्व प्रवासी सुखरुपपणे बसच्या बाहेर आले. बस मध्ये एकूण 24 प्रवासी होते.
सिरमौर जिल्ह्यात एक खासगी प्रवासी बस पांवटा साहिब येथून शिलाईकडे जात होती. बस कफोटापासून 10 किमी अंतरावर घाटात पोहोचली त्यावेळी अचानक बसचा रॉड तटुला आणि ती बस अनियंत्रित झाली. त्यामुळे बस थेट दरीच्या कठड्यावर चढली आणि दरीमध्ये झुकली. त्याचवेळी चालकाने जोराचा ब्रेक लावल्याने अर्धी बस हवेत तरंगत राहिली. हा प्रकार पाहून सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
शेवटचा प्रवासी उतरेपर्यंत ब्रेकवर पाय-