गुरदासपूर ( चंदीगड ) - बटाळ्याजवळील बिजलीवाल गावाकडे ( school bus fire in Bijliwal ) जाणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसला पेट घेतल्याने अपघात झाला. आग लागल्याने बस शेतात पलटी झाली. त्यानंतर चालक आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी मुलांना बाहेर काढण्यासाठी धडपड केली. या भीषण अपघातात बस जळून खाक झाली ( school bus catches fire in Punjab ) आहे. अपघातात तीन मुले गंभीर जखमी झाले ( 3 children seriously injured ) आहेत.
पंजाबचे शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर ( Punjab Education Minister Gurmeet Singh ) यांनीही डीसी गुरुदासपूर यांनी अपघाताचा बातमी ट्विट केली आहे. शाळेच्या बसचा चालक जगप्रीत सिंगने सांगितले की, श्री गुरु हर राय पब्लिक स्कूल ( Sri Guru Har Rai Public School ) किला लाल सिंगमधील सुमारे ४२ मुलांना जवळच्या गावांमध्ये सोडण्यासाठी बसमध्ये घेऊन जात होता. बस बरकीवालजवळ पोहोचल्यानंतर गव्हाच्या शेताला लागलेल्या आगीमुळे बसवरी नियंत्रण सुटले. बस शेतातच पलटी झाली. आगीने बसला वेढले.
मुले खासगी रुग्णालयात दाखल- चालक जगप्रीत म्हणाले, की त्याने सर्व मुलांना बाहेर काढण्यासाठी खूप धडपड केली. तो स्वतः जखमी झाला. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. तीन मुले गंभीर जखमी आहेत. मुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.