महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कासगंज चकमक : पोलीस शिपायाची हत्या करणारा मुख्य आरोपी गोळीबारात ठार - मोतीराम दारू माफिया

शिपाई देवेंद्र यांची कुख्यात गुंड मोतीराम याने हत्या केली होती. घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १२ पथके तयार केली होती. तसेच पाच स्पेशल टास्क फोर्स पथकेही तयार केली होती. या प्रकरणातील एक आरोपी आधीच पोलीस चकमकीत ठार झाला होता. मात्र, मुख्य आरोपी मोतीराम फरार होता.

कासगंज चकमक
कासगंज चकमक

By

Published : Feb 21, 2021, 1:17 PM IST

Updated : Feb 21, 2021, 2:56 PM IST

कासगंज - उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका पोलीस शिपायाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी मोतीरामच्या शोधात पोलीस होते. आज चकमकीत मोतीराम ठार झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता.

घटनास्थळावरून माहिती घेताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

शिपाई देवेंद्र यांची कुख्यात गुंड मोतीराम याने हत्या केली होती. घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १२ पथके तयार केली होती. तसेच पाच स्पेशल टास्क फोर्स पथकेही तयार केली होती. या प्रकरणातील एक आरोपी आधीच पोलीस चकमकीत ठार झाला होता. मात्र, मुख्य आरोपी मोतीराम फरार होता.

आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीची घेरांबदी केली. मात्र, मोतीरामने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी उत्तर दिले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मोतीराम गंभीर जखमी झाला.

काय आहे प्रकरण..?

घटनास्थळावरून माहिती घेताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

जिल्ह्यातील सिढपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीमर गावामध्ये दारु माफियांच्या कारवाया वाढत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधिकारी अशोक कुमार सिंह आणि पोलीस शिपाई देवेंद्र सिंह कारवाई करण्यास गेले होते. मात्र, पोलिसांवर दारू माफिया मोतीराम आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. पोलिसांना झाडाला बांधून बेदम मारहाण केली होती. यात अधिकारी मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. तर, शिपाई देवेंद्र यांचा मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेनंतर आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अजय आनंद तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. आरोपींच्या शोधासाठी तैनात पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. त्यानंतर दारू माफियांसोबत झालेल्या चकमकीत एलकार नावाच्या माफियाला ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि एलकारचा भाऊ मोतीराम मात्र पसार झाला. मोतीरामवर ११ गुन्हे दाखल होते. मात्र, आज पोलीस चकमकीत तो ठार झाला.

Last Updated : Feb 21, 2021, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details