नवी दिल्ली -उदयपूरमधील कन्हैया लालच्या निर्घृण हत्येचे प्रकरण ( Congress spokesperson Pawan Kheda on Riyaz Attari ) आता राजकीय रंग घेत आहे. मुख्य सूत्रधार रियाझ अटारीचा ( Riyaz Attari Udaipur murder case ) भगवा पक्षाशी संबंध असल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसने भाजपवर केला. उदयपूरमध्ये कन्हैया लालची दोन मुस्लीम तरुणांनी हत्या केली होती. या हत्याप्रकरणावर काँग्रेसने हा आरोप ( Congress says Udaipur accused related to BJP ) केला आहे. नवी दिल्लीतील मुख्यालयातून मीडिया कर्मचाऱ्यांना संबोधित करताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी सरकारवर जातीयवादी अजेंडा पसरवल्याचा आरोप केला आहे.
Congress on Riyaz Attari : उदयपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी अटारी याचे भाजपशी जवळचे संबंध, काँग्रेसचा आरोप - Congress spokesperson Pawan Kheda on Riyaz Attari
राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या निर्घृण हत्येप्रकरणी काँग्रेसने ( Congress spokesperson Pawan Kheda on Riyaz Attari ) भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप या प्रकरणाला जातीय रंग देत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यातील शांतता आणि सौहार्दाला धोका - राज्यातील शांतता आणि सौहार्दाला धोका निर्माण झाला आहे, असे सांगत या प्रकरणाला जातीय रंग दिल्याचा आरोप खेडा यांनी केला. आमच्या संशोधन आणि इतर माहितीच्या आधारे समजलेली वस्तुस्थिती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, उदयपूर घटनेतील मुख्य आरोपी रियाझ अटारी याचे भाजपशी जवळचे संबंध होते. रियाझ अटारी याचे दोन भाजप नेते इर्शाद चैनवाला आणि मोहम्मद ताहिर यांच्याशी असलेले संबंध आणि छायाचित्रे सर्वज्ञात आहेत, अशी माहिती खेडा यांनी दिली.
अटारीचे भाजप नेत्याशी संबंध - पवन खेडा : मुख्य आरोपी रियाझ अटारी हा राजस्थान भाजपचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असे, हेही या खुलाशातून समोर आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भाजप नेते इर्शाद चैनवाला यांची 30 नोव्हेंबर 2018 आणि मोहम्मद ताहीर यांची 3 फेब्रुवारी 2019, 27 ऑक्टोबर 2019, 10 ऑगस्ट 2021, 28 नोव्हेंबर 2019 आणि इतर फेसबुक पोस्ट्सवरून हे स्पष्ट होते की, रियाझ केवळ भाजप नेत्यांच्या जवळचाच नव्हता, तर तो भाजपचे सक्रिय सदस्य होता, असे खेडा यांनी सांगितले. राज्यातील गेहलोत सरकारने एनआयएला सहकार्य करण्याचे मान्य केले. हा घाईचा निर्णय असल्याचे सांगून खेडा यांनी भगवा पक्षावर टीका केली. यावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मौन बाळगून आहेत, असे खेडा म्हाणाले.