महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रिप्ड जीन्स विधानावर महिला नेत्यांचा तीरथसिंह रावत यांच्यावर हल्लाबोल

अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनंतर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्यावर टीका केली. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, असे वादग्रस्त विधान तिरथ सिंह यांनी केलंय.

रिप्ड जीन्स
रिप्ड जीन्स

By

Published : Mar 18, 2021, 2:56 PM IST

डेहराडून -उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी महिलांनी फाटलेली जीन्स घालण्याबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनंतर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथसिंह रावत यांच्यावर टीका केली.

टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत म्हटलंय, मुख्यमंत्री म्हणतायं, महिलेच्या पायाकडे पाहिले तर तीने गमबूट घातले होते. तर गुडघ्यावरची जीन्स फाटलेली होती. मुख्यमंत्री साहेब महिलांना वर-खाली, पुढे-मागे फक्त निर्लज्ज माणूस पाहतो.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तिरथसिंह रावत यांच्या विधानावर भाष्य केले आहे. महिलांना त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरून मूल्यांकन करणाऱ्या पुरुषांमुळे देशातील संस्कृती आणि संस्कारावर फरक पडतो. मुख्यमंत्री साहेब विचार बदला, तरच देश बदलेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले आहे.

तिरथ सिंह रावत यांच्या या वक्तव्यावर काँग्रसेनं टीका केली आहे. काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्वीट करत म्हटलंय, "फाटकी जीन्स घातल्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येते. त्यामुळे महिलांनी ते टाळायला हवं, असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजपा, हे तुमचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आहेत. तुम्ही याचं समर्थन करता का?," असा सवाल झा यांनी उपस्थित केला.

काय प्रकरण?

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, हे विधान त्यांनी केले. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुले-मुली फाटलेली जीन्स घालतात. या प्रकारचे वातावरण योग्य नाही. हे ब्रिटिशांचे अनुसरन करत आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, ज्या मुलाला संस्कार आहे. तो कधीही अपयशी ठरू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांचे विधान वादात पडताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -महिला फाटक्या जीन्स घालतात, मुलांना काय संस्कार देणार, भाजपाच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

ABOUT THE AUTHOR

...view details