मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) ची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स ( MI ) ने स्वतःसाठी एक मोठी योजना आखली आहे. तसेच त्या दिशेने जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई फ्रँचायझीला आता जगभरातील लीगमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. आयपीएलशिवाय या फ्रँचायझीने परदेशी लीगमध्येही दोन संघ खरेदी केले आहेत. हे लक्षात घेऊन भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीन खान आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई फ्रँचायझीने झहीर खानला हेड ऑफ क्रिकेट डेवलपमेंट पदी बढती ( Zaheer Khan promoted as Head of Cricket Development ) दिली आहे. तर जयवर्धनेची हेड ऑफ परफॉर्मेंस ( Mahela Jayawardene as Head of Performance ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच आता या दोन्ही दिग्गजांवर फ्रँचायझीच्या तिन्ही संघांची संपूर्ण जबाबदारी असेल. जयवर्धने आता तिन्ही संघांचे जागतिक प्रशिक्षकही असतील. म्हणजेच मुंबई इंडियन्ससह तिन्ही संघांसाठी स्वतंत्रपणे तीन नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिन्ही संघांमध्ये समन्वय राखण्यासाठी जयवर्धने संघाच्या मुख्य प्रशिक्षकांशी जवळून काम करेल.
झहीरकडे असणार टॅलेंट शोधण्याचे काम -
खेळाडूंना विकासित करण्याची मुख्य जबाबदारी झहीर खानची असेल. झहीरकडे प्रतिभा शोधण्याची आणि त्याची एमआय फ्रँचायझी मजबूत करण्याची जबाबदारीही असेल. मुंबई फ्रँचायझी या धोरणासाठी प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे या फ्रँचायझीने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि इशान किशनसारखे खेळाडू दिले आहेत.
केंद्रीय संघ तयार करण्याचा उद्देश -