महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य मिळवून देणारे 'साबरमतीचे संत' महात्मा गांधी! - स्वातंत्र्य सेनानी

स्वातंत्र्यलढ्यात आश्रमाचे महत्त्वाचे स्थान होते. राष्ट्रीय जागरूकता आणि सामाजिक बदलांच्या अनेक चळवळींची ही सुरुवात होते. साबरमती आश्रमात सध्या 165 इमारती आहेत. गांधीजींच्या मृत्यूनंतर, 'माझे जीवन हाच माझा संदेश आहे' अशी गॅलरीची आश्रमात स्थापन करण्यात आली आहे. ही गॅलरी बापूंच्या बालपणापासून ते शेवटच्या प्रवासापर्यंत जीवनशैली दर्शवते. या आश्रमाच्या स्थापनेचा मुख्य हेतू लोकांना 'आत्मनिर्भर' (स्वावलंबी) बनवणे तसेच स्वदेशी गोष्टींचा अवलंब करणे हा होता.

स्वातंत्र्याची 75 वर्षे
स्वातंत्र्याची 75 वर्षे

By

Published : Oct 2, 2021, 6:07 AM IST

अहमदाबाद (गुजरात) -महात्मा गांधीजी आणि साबरमती नदीचे अनोखे नाते आहे. दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर गांधीजींनी अहमदाबादमध्ये आश्रम बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1917 मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली. साबरमती आश्रमापूर्वी ते कोचरब आश्रमात दोन वर्षे राहिले आहे.

स्वातंत्र्य मिळवून देणारे 'साबरमतीचे संत' महात्मा गांधी!

गांधीजी आणि साबरमतीचं एक वेगळ नातं होतं

प्रेमचंदभाईंनी नदीच्या किनाऱ्यावरील एका आश्रमासाठी 1 एकर जमीन 2,556 रुपयांना दिली होती. प्रथम त्यांनी आश्रम बांधण्यास सुरुवात केली आणि ताब्यात मिळताच ते कोचरब आश्रमातून साबरमती आश्रमात आले, असे इतिहासकार डॉ. माणिकभाई पटेल सांगतात. एक आश्रम जो स्वतःच्या समाजासह विकसित होऊ शकतो ही गांधीजींची कल्पना होती. साबरमती नदीच्या शांत किनाऱ्यांनी बापूंची कल्पना उत्तम प्रकारे पूर्ण केली. त्यांना साबरमती आश्रमाची जागा खूप आवडली. गांधीजींनी त्यावेळी असेही म्हटले होते की, ही जागा आश्रमासाठी योग्य आहे. कारण याच्या एका बाजूला स्मशानभूमी आहे आणि दुसऱ्या बाजूला तुरुंग आहे. या आश्रमात येणाऱ्या कोणत्याही सत्याग्रहीला फक्त दोनच पर्याय असतील. तुरुंगात जाण्यास तयार राहा अन्यथा सत्याग्रहाद्वारे त्याग करण्यास तयार राहा. साधेपणा हा बापूंच्या जीवनाचा प्रतिशब्द आहे आणि आश्रम ते प्रतिबिंबित करतो. त्याच वेळी, आश्रमात सामूहिक कामांच्या संकल्पनेवर विशेष लक्ष दिले गेले. गांधी आश्रमाचा सर्वात महत्वाचा भाग, ज्याला हृदयकुंज म्हणतात, हे गांधीजींचे निवासस्थान आहे आणि त्याच्या नावाच्या मागे एक विशेष कथा आहे.

गांधीजींचा प्रार्थनेवर अधिक भर असायचा

गांधी आश्रमाचे संचालक अतुल पंड्या म्हणतात, की काकासाहेब कालेलकरांनी 'हृदय कुंज' हे नाव दिले. गांधीजींच्या आश्रमातील अधिकृत निवासस्थानाचे नाव देण्यामागील त्यांचा हेतू हा होता की गांधीजी हे आश्रमाचे हृदय होते. त्यामुळे ते जिथे राहत होते त्या ठिकाणाचे नाव असणे आवश्यक आहे. 'हृदय कुंज' असे म्हटले जावे. गांधीजींकडे हृदयकुंजमध्ये स्वतंत्र बेडरूम नव्हते. त्यांनी हृदयकुंजमधील कॉरिडॉरमध्ये चरखा चालवायचे आणि जवळच झोपायचे. गांधीजींच्या जीवनात प्रार्थनेचे अनन्यसाधारण महत्त्व होते आणि आश्रमाची दैनंदिन दिनचर्या तिथून सकाळी साडेचार वाजता सुरू होत आणि संध्याकाळच्या प्रार्थनेने संपत असत. आश्रमाने दिवसाची कार्यवाही आणि दुसऱ्या दिवसाच्या योजनेवरही चर्चा होत असे. हृदयकुंजजवळ प्रार्थना सभेसाठी जागा आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : संगीतालाच शस्त्र बनविणारे स्वातंत्र्य सेनानी रामसिंह ठाकूर, वाचा सविस्तर...

साबरमती आश्रमात सर्वांना नियमांचे पालन करणे अनिवार्य होते

देश -विदेशातून साबरमती आश्रमात अनेकजण त्यांना भेटायला येत होते. मात्र, आश्रमाचे नियम सर्वांसाठी सारखेच होते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मीराबाई गांधीजींपासून इतक्या प्रेरित होत्या की तीने इंग्लंडमधून भारतात येण्याचा आणि गांधीजींबरोबर आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. तिने आपला पोशाखही पूर्णपणे बदलला आणि खादी वस्त्र बनवण्यासाठी चरखा फिरवायलाही शिकले, असे इतिहासकार मानेकभाई पटेल म्हणतात. हा आश्रम केवळ गांधीजी किंवा इतर सत्याग्रहींचे आश्रयस्थान नव्हते. स्वातंत्र्यलढ्यात आश्रमाचे महत्त्वाचे स्थान होते. राष्ट्रीय जागरूकता आणि सामाजिक बदलांच्या अनेक चळवळींची ही सुरुवात होते. साबरमती आश्रमात सध्या 165 इमारती आहेत. गांधीजींच्या मृत्यूनंतर, 'माझे जीवन हाच माझा संदेश आहे' अशी गॅलरीची आश्रमात स्थापन करण्यात आली आहे. ही गॅलरी बापूंच्या बालपणापासून ते शेवटच्या प्रवासापर्यंत जीवनशैली दर्शवते. या आश्रमाच्या स्थापनेचा मुख्य हेतू लोकांना 'आत्मनिर्भर' (स्वावलंबी) बनवणे तसेच स्वदेशी गोष्टींचा अवलंब करणे हा होता. गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक संग्रहालयही आश्रम परिसरात बांधण्यात आले. संग्रहालयात गांधीजींचे चष्मे, त्यांची काठी, चरखा आदी साहित्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : मलबार क्रांतीतील स्वातंत्र्य योद्धा केरळ वर्मा पळाशीराजा, वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details