बेळगाव : महाराष्ट्र सीमा समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना खासदार धैर्यशील माने (Maharastra MP Dhairyasheel Mane) यांना बेळगावच्या हद्दीत प्रवेशबंदी करणारा आदेश बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील यांनी जारी केला आहे. (Dhairyasheel Mane Barred from entering Belgaon). उपायुक्तांनी सीआरपीसी 1973 च्या कलम 144(3) अन्वये हा आदेश जारी केला आहे. बेळगावमध्ये उद्या (19 डिसेंबर) होणाऱ्या एमईएस महामेळाव्यासाठी येणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना पुरेसा बंदोबस्त प्रदान करण्याचे पत्र पाठवले आहे.
Border Dispute : खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास मनाई, आदेश जारी - बेळगावचे उपायुक्त नितेश पाटील
बेळगावमध्ये उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून (assembly session in Belgaon) त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याची गरज आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. (Dhairyasheel Mane Barred from entering Belgaon)
Etv Bharat
बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे अधिवेशन : बेळगावमध्ये उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याची गरज आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. अधिवेशन काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी हे आदेश जारी केले.