बडोदा- बडोदा येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांनी वर्षानुवर्षे चालत आलेली किल्ल्यांची पंरपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्रा दिवाळीला मातीचे किल्ले बांधण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमिवर बडोद्याच्या महाराष्ट्रीय कुटुंबाने मातीपासून किल्ला बांधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती-
महाराष्ट्र आणि गुजरात एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी ते सांस्कृतिकदृष्ट्या जोडले गेले आहेत. दोन्ही राज्यांनी उत्तरायण, नवरात्र, जन्माष्टमी, दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. दिवाळीनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी किल्ले बांधले जाताता. बडोदा येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबीयांनी दिवाळीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. हा किल्ला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.