महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - maharashtra mp in loksabha

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

By

Published : Mar 10, 2021, 1:46 PM IST

Updated : Mar 10, 2021, 1:57 PM IST

13:34 March 10

शिवसेना खासदार अरविंद सावंत

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा कामकाजादरम्यान आज केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या पाणबुडी व नौका उभारणी कंपनीसंदर्भातील समस्या मांडल्या. माझगाव नौदल गोदीत आग लागल्याचे त्यांनी सांगितले. माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नारायण प्रसाद या घटना दाबल्या. त्यांची कारवाई करावी आणि याप्रकरणी तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

13:04 March 10

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार आज संसदेत काय बोलले?

शिवसेना खासदार विनायक राऊत

नवी दिल्ली -  शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा कामकाजादरम्यान दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर आत्महत्या प्रकरण मुद्दा मांडला. प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. गुजराती भाषेतील सुसाईड नोटमध्ये काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांच्या आत्महत्येला कारण असलेल्या लोकांना निलंबीत करावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.  

Last Updated : Mar 10, 2021, 1:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details