महाराष्ट्र

maharashtra

Todays Top News : आज दिवसभरात राज्यात काय घडणार, जाणून घ्या एकाच क्लिकवर

By

Published : Dec 17, 2022, 7:04 AM IST

आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार ( Maha Vikas Aghadi Mahamorcha ) आहे. सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन करणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today )

Todays Top News
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

मुंबई :आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे.( Maha Vikas Aghadi Mahamorcha ) भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी 10.30 वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.

  • भाजपचे माफी मांगो आंदोलन :सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचे माफी मांगो आंदोलन करणार आहे. आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार आहेत.
  • हिंदुत्ववादी संस्थांकडून आज ठाणे बंद : हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिला. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आली आहे.
  • ग्रामपंचायत मतदानासाठी तयारी :धुळ्यात रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. 119 ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अकोल्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे . मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील. वाशिम जिल्ह्यात 18 डिसेंम्बर रोजी होऊ घातलेल्या 287 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील.
  • नीलम गोऱ्हे दुपारी नागपुरात : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळ अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी नागपुरात दाखल होतील. त्यानंतर ते शिवसेनेच्या निवडक प्रतिनिधींसोबत भेट घेणार आहे. याशिवाय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज नागपुरात पोहोचतील आणि तयारीचा आढावा घेतील.
  • दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या शुभारंभ साठी क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
  • पुण्यात Rum for soldiers, Run with soldiers’ चे आयोजन : विजय दिवसानिमित्त ‘विजय रण- Rum for soldiers, Run with soldiers’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details