महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'महाराष्ट्र समाज अहमदाबाद'ची शतकपूर्ती; अमित शाहांना आठवले 'छत्रपती शिवराय'

Maharashtra Samaj Ahmedabad : अहमदाबाद इथं स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. या संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी अमित शाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. त्यासह त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचं स्मरण केलं.

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 8:01 AM IST

Updated : Dec 17, 2023, 11:43 AM IST

Maharashtra Samaj Ahmedabad
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

अहमदाबाद Maharashtra Samaj Ahmedabad : मराठी नागरिक अहमदाबादमध्ये मोठ्या संख्येनं राहत आहेत. अहमदाबादमधील त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित साह यांची उपस्थिती होती. मराठी नागरिक अहमदाबादमध्ये निगडित असल्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक, सामाजिक, संगीत, रक्तदान अशा विविध कार्यक्रमाचं यात आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र समाज अहमदाबादला झाले 100 वर्ष पूर्ण :गुजरातमधील मराठी बांधवांनी अहमदाबादमध्ये 1924 ला महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त एहमदाबाद इथं विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेला 100 वर्ष पूर्ण

मराठी बांधवांची गुजरातच्या विकासात मोलाची भूमिका :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी मराठी बांधवांमुळं गुजरातचा विकास झाला असं सांगितलं. ते म्हणाले की, "टिळक महाराजांच्या जयंतीदिनी 1924 साली 'महाराष्ट्र समाज अहमदाबाद' ही संस्था स्थापन झाली. महाराष्ट्र समाज अहमदाबादनं नुकतीच आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र समाज अहमदाबादनं गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील संस्कृतींचा उत्तम मिलाफ केला आहे. मराठी भाषा आणि मराठा संस्कृती जिवंत ठेवत गुजरातच्या विकासात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र समाज अहमदाबादनं बजावली आहे. महाराष्ट्र समाज अहमदाबादची शताब्दी साजरी करण्याच्या निमित्तानं आज मराठी लोकांशी संवाद साधताना आनंद झाला".

महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेला 100 वर्ष पूर्ण

महाराष्ट्राच्या योगदानाशिवाय स्वातंत्र्याची कल्पना शून्य :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत अमित शाह यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचं स्मरण केलं. याबाबत बोलताना ते म्हणाले की, " भारताच्या स्वातंत्र्याची कल्पना महाराष्ट्राच्या योगदानाशिवाय शक्य नाही. युगानुयुगे कधी कधी शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व जन्माला येते. त्यांनी पेटवलेली स्वराज्याची मशाल तामिळनाडूपासून गुजरातपर्यंत पसरली. इंग्रजांच्या राजवटीनंतरही महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र्य सैनिक झाले. त्यात चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले आणि वीर सावरकर अशा महापुरुषांचा जन्म झाला".

महाराष्ट्र समाज अहमदाबाद या संस्थेला 100 वर्ष पूर्ण

मराठी भाषिक नागरिक स्थायिक झाले :मुस्लिम शासकांची ऐतिहासिक राजधानी म्हणून अहमदाबादचा नावलौकीक होता. मात्र बडोद्याच्या गायकवाडांनी अहमदाबाद ही मुस्लिमांची राजधानी जिंकली होती. त्यामुळं अहमदाबाद हे शहर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आलं. बडोदा राज्याच्या राजवटीत अनेक मराठी भाषिक लोक अहमदाबाद शहर परिसरात स्थायिक झाले आहेत. काही मराठी बांधव साबरमती नदीच्या काठी भद्रकालीच्या मंदिराजवळ असलेल्या भद्रा परिसरातही स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा :

  1. "तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता", अमित शाहंच्या नेहरूंवरील टीकेला फारुख अब्दुल्लांचं उत्तर
  2. मणिपुरातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेनं हत्यारं टाकले, आतापर्यंतचा सर्वात मोठा शांतता करार
  3. "पाकव्याप्त काश्मीर नेहरूंची चूक, कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं", अमित शाह यांचा लोकसभेतच आरोप
Last Updated : Dec 17, 2023, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details