महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shiv Sena Party Symbol News : उद्धव ठाकरेंच्या हाती मशाल राहणार की जाणार? सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाच्या याचिकेवर आज सुनावणी - सर्वोच्च न्यायालय

ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे मशाल पक्ष चिन्ह आहे. परंतु हे पक्षचिन्ह तात्पुरते असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. धगधगती मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे,असा दावा या पक्षाने केला आहे. मशाल आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, ते उद्धव ठाकरेंना देऊ नये,अशी याचिका समता पार्टीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होत आहे.

मशाल चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मशाल चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

By

Published : Jul 17, 2023, 1:30 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. पण मशाल चिन्हावरुनही समता पक्ष आणि ठाकरे गटात मोठा वाद सुरू झाला. आता आज त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय कोणाच्या हातात मशाल देणार हे पाहावे लागेल.

आता मशालही जाणार : मागील वर्षी एकनाथ शिंदेंनी 50 आमदारासह बंड करत शिवसेनेत फूट पाडली होती. त्यानंतर शिवसेना पक्ष चिन्ह आणि पक्ष नावावर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. त्याच दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना मशाल चिन्हे तात्पुरते वापरले होते. मात्र धगधगती मशाल चिन्ह हे दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाचे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिल्याने त्यावर समता पार्टीने आक्षेप घेतला. मशाल चिन्ह आमची निशाणी आहे, हे चिन्ह उद्धव ठाकरेंना देऊ नका, अशी मागणी करत समता पार्टीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमच्या पक्षाची मान्यता तात्पुरता काढली गेली होती. याचा अर्थ आमच्या पक्षाचे चिन्ह दुसऱ्या कोणत्या पक्षाने वापरणे उचित नव्हे. म्हणून हे आव्हान न्यायालयात देण्यात आल्याचे समता पक्षाने म्हटले आहे.

मशाल चिन्ह हे अंतरिम मिळाले नाही :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने समता पक्षाचा दावा खोडून काढला होता. अंधेरी निवडणुकीवेळी मशाल चिन्ह, मिळावे ही मागणी ठाकरे गटाने केली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने हे स्पष्टपणे सांगितले होते की, मशाल चिन्ह हे काही अंतरिम नाही. त्यावर पुनर्विचार केला जाऊ शकतो. हाच धागा पकडत समता पक्षाने आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आज थोड्याच वेळात त्याची सुनावणी होईल. समता पक्षाला हे चिन्ह मिळते की उद्धव ठाकरे गटाकडे राहते ते स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis: १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, २ आठवड्यांचा दिला वेळ
  2. Uddhav Thackeray : 'मी फक्त जाणीव करून दिली, शिव्या दिल्या नाही', फडणवीसांवरील वक्तव्यावर उध्दव ठाकरेंचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details