हेद्राबाद:शिवसेनेचे विश्वासु नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा गाडला आणि महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी तडजोड करत शिवसेनेने धक्का दिला पण आता शिवसेनेचे पतन होताना पहायला मिळत आहे. शिवसेना नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई, समन्वयाचा अभाव, हिदुत्वाची भुमीका, मुख्यमंत्र्यांचा दुरावा, सरकारमधे काम न होणे ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. भाजपने सरकारला अडचणीत आनण्याची एकही संधी सोडली नाही. आम्ही सरकार पाडणार नाही सरकार आपोआप पडेल असे सांगतानाच वेगवेगळ्या मुद्यांवरुन सरकारला अडचणीत आणताना नाराजांना गोंजरण्याचे काम भाजपने केले आणि गाफील शिवसेनेला खिंडार पाडले.
ई़डीच्या कारवाया: राज्यात राज्य सरकार विरुध्द केंद्रिय तपास यंत्रणा हा सामना चांगलाच रंगला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर आव्हानच स्विकारले आणि मुख्यमंत्र्यांसह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिवसेनेचे अनिल परब, संजय राऊत, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर, आनंद अडसुळ, यशवंत जाधव अशा नेत्यांवर इडीच्या धाडी पडल्या आहेत. अनेकजण चोकशीच्या फेऱ्यात आहेत. तर अनेकांच्या संप्पतीवर टाच आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तसेच मेव्हणे आणि नेत्यांच्या नातेवाईकांवरही आरोप आणि चौैकशीची टांगती तलवार आहे. चौकशीचा ससेमीरा नको म्हणुन अनेक नेते उध्दव ठाकरे यांना भाजपशी जुळवुन घेण्याची मागणी करत होते.
मुख्यमंत्र्यांचा दुरावा:उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारल्या पासुन शिवसेनेत धुसफुस होती. यातच सरकार स्थापनेनंतर आलेले कोरोना संकट तसेच त्या नंतर उध्दव ठाकरे यांचे आजारपण त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातुन बैठका समारंभ यात सहभागी होत होते. राष्ट्रवादी तसेच काॅग्रेसचे सगळे नेते प्रत्यक्ष हजर असायचे मुख्यमंत्री घरात बसुन राज्याचा कारभार पाहतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत गेला. पक्षातील पदाधिकारी नेते तचेच सामांन्यांचीही तीच भावणा झाली.
समन्वयाचा अभाव: मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कारभार सुरु असताना पक्ष आणि सरकारच्या पातळीवर समन्वयाचा अभाव पहायला मिळायचा पक्ष प्रमुखच मुख्यमंत्री होते. पक्ष आणि सरकारच्या पातळीवर आवश्यक समन्वय नसायचा ही बाब हेरुन एकनाथ शिंंदे यांनी आमदार तसेच सरकार पातळीवर समन्वयाची भुमीका निभावताना सरकार आणि आमदारांच्या पातळीवर आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्यातुनच त्यांची इतर नाराज नेते आणि आमदारांशी जवळीक झाली. त्यांनी अनेक आमदारांची कामे मार्गी लावायला मदत केली त्याचा त्यांना या बंडाच्या वेळी फायदा झाल्याचे सांगण्यात येते.