महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष; 'या' पाच न्यायामूर्तींनी नोंदवले महत्वाचे निरीक्षण - महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालावर आज सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्ती निकाल देणार होते. याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा या पाच न्यायमूर्तींनी आज निरीक्षण नोंदविले आहे. तब्बल दहा महिने सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाले आहेत.

Etv Bharat
फाईल फोटो

By

Published : May 11, 2023, 10:05 AM IST

Updated : May 11, 2023, 1:30 PM IST

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक प्रकरण म्हणून या निर्णयाकडे पाहिले जाते. हे प्रकरण जून 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. तब्बल 10 महिने या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता आज या प्रकरणाचा निकाल जाहीर होईल, अशी शक्यता होती. परंतु पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविले आहे.

कोणी कोणाची बाजू मांडली - ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

  1. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड - धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये शपथ घेतली होती. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणूनही काम केले आहे. चंद्रचूड हे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश होते.
  2. न्यायमूर्ती एम आर शाह -एम आर शाह हे मूळचे गुजरातचे रहिवासी आहेत. 2005 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2018 मध्ये पाटणा उच्च् न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शाह यांनी काम पाहिले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून काम सुरु केले होते. शाह आता 15 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
  3. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी - मुरारी यांनी अलाहाबाद उच्च् न्यायालयात तब्बल 22 वर्षे वकिली केली आहे. 2005 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कृष्ण मुरारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2018 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम सुरु केले होते.
  4. न्यायमूर्ती हिमा कोहली- ज्येष्ठ वकील कोहली यांनी 1987 पासून वकिली करत आहेत, 1994 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनी न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 31 ऑगस्ट 2021 पासून त्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत.
  5. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा -2008 पासून नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून काम सुरु केले होते. त्यानंतर 2021 पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती.

सत्तासंघर्षासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा -

Last Updated : May 11, 2023, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details