नवी दिल्ली - महाराष्ट्रात जून 2022 मधील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे याबाबतची (Shivsena Political Crisis) याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भातील सुनावणीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने (Shivsena Name Symbol) मुद्दा मांडताना वकिलांनी 370 कलमाचा संदर्भ मांडला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या (SC Hearing on Shivsena Crisis) सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होईल असे म्हटले होते. त्याबाबत वकिलांनी संदर्भ देताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी टिप्पणी केली की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.
काय आहे प्रकरण - जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने दावा केला. तो भारतीय निवडणूक आयोगाने मान्य केला. निवडणूक आयोगाच्या त्या निकालाला आणि निर्णयाला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी 370 कलमबाबत सुनावणी झाल्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी होईल हे स्पष्ट केले होते.