Sharad Pawar NCP Meeting : बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार - ncp meeting in delhi
राष्ट्रवादीचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष (NCP President Sharad Pawar) आहे. त्यामुळे कोणी कितीही नियुक्या करुद्या त्यात काहीच तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. बुधवारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली आहे. यात 8 ठराव मंजूर करण्यात (NCP Delhi Meeting) आले आहेत. तसेच खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
Etv Bharat
By
Published : Jul 6, 2023, 5:36 PM IST
|
Updated : Jul 6, 2023, 9:53 PM IST
शरद पवार यांची पत्रकार परिषद
नवी दिल्ली -राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी (NCP Delhi Meeting) पार पडली. यात विविध 8 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कोणी किती नियुक्त करुद्या त्यात काहीच तथ्य नसून, राष्ट्रवादीचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष (NCP President Sharad Pawar) असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोणी कितीही नियुक्त्या केल्या तरी त्यात काहीच सत्य नाही. राष्ट्रवादी पक्षाचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तसेच नवी दिल्लीत झालेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही नियमांना धरूनच होती. कोणी काहीही बोलेल तर त्यात काही तथ्य नाही - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
तटकरे, पटेल निलंबित - पक्षाविरोधात कार्यवाही केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याबरोबरच तसेच शपथ घेतलेल्या सर्व आमदारांचेही पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नाही. राष्ट्रवादीचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून, आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
शपथ घेतलेल्या 9 आमदारांची पक्षातून हकालपट्टी - पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. जनतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आले असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल -२०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
आमदारांनी सह्यांचे दिलेले ते पत्रं खरे - एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचे एक पत्र दिले होते. त्यात पक्षाचे पुढील धोरण काय असावे, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. त्यावर मी बैठक बोलावली होती. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.