महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र विधानसभेवर बरखास्तीची टांगती तलवार; उद्धव ठाकरे देऊ शकतात राजीनामा - Maharashtra Political Crisis

महाराष्ट्रात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीत नवे वळण (Maharashtra Political Crisis) आले आहे. महाराष्ट्र विधानसभेवर सध्या बरखास्तदीची (Maharashtra Vidhansabha May suspended) टांगती तलवार आहे. थोड्याच वेळात मंत्रीमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात उध्दव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात (Uddhav Thackeray can resign) अशी शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Vidhansabha
महाराष्ट्र विधानसभा

By

Published : Jun 22, 2022, 12:52 PM IST

Updated : Jun 22, 2022, 1:18 PM IST

मुंबई:महाराष्ट्रात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीत नवे वळण आले आहे. महाराष्ट्र विधानसभेवर सध्या बरखास्तदीची (Maharashtra Political Crisis) टांगती तलवार आहे. थोड्याच वेळात मंत्रीमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात उध्दव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात (Uddhav Thackeray can resign) अशी शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे. राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांशीही चर्चा करणार आहेत.

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. बंडखोर आमदारांचा गट मध्यरात्री सुरत येथुन गुवाहटीला गेले आहेत. ते काय करणार आणि राज्याच्या सरकारचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही वेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे'.

शिवसेनेचे वजनदार नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि शिवसेने सोबतच राज्यात मोठे वादळ उठले. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले, त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. राऊतांनी विधानसभा बरखास्ती म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचे संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, किंवा सत्ताधारी पक्षावर अविश्वास ठराव आणला आणि तो ते जिंकू शकले नाही तर विधानसभा बरखास्त होऊ शकते. .

सरकारने विधानसभा भंग करण्याची शिफारस केली आणि राज्यपालांनी शिफारस मंजुर केली तर विधानसभा भंग होऊ शकते आणि तसे झाले तर राज्यात पुन्हा निवडणुका लागु शकतात. पण राज्यपालांनी शिफारस नाकारली तर सरकर अल्पमतात जाऊ शकते. अशा परस्थितीत राज्यपाल सरकारला बहुमत सिध्द करायला सांगु शकतात आणि विधानसभा भंग झाली नाही तर भाजप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करु शकतात. या परस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला विरोधीपक्षात बसावे लागेल.

हेही वाचा : Eknath Shinde : 'जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल; पण लक्षात ठेवा, संजय राऊत यांचा इशारा नेमका कोणाला ?

Last Updated : Jun 22, 2022, 1:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details