महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kalicharan Transit Remand : कालीचरणला महाराष्ट्रात आणण्यासाठी मिळाला ट्रांझिट रिमांड; पुणे न्यायालयात करणार हजर - कालीचरण पुणे कोर्ट हजेरी

कालीचरणला महाराष्ट्रात ( Sant Kalicharan Transit Remand ) आणण्यासाठी पोलिसांना आता 6 जानेवारीपर्यंत ट्रांझिट रिमांड मिळाला आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक ( Controversial Remarks on Mahatma Gandhi ) वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो ( Kalicharan Maharaj Arrested ) येथून कालीचरण महाराजला अटक केली होती.

Controversial remarks against Mahatma Gandhi
Controversial remarks against Mahatma Gandhi

By

Published : Jan 4, 2022, 6:34 PM IST

Updated : Jan 4, 2022, 7:00 PM IST

रायपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक ( Controversial Remarks on Mahatma Gandhi ) वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो ( Kalicharan Maharaj Arrested ) येथून कालीचरण महाराजला अटक केली होती. त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी पोलिसांना आता 6 जानेवारीपर्यंत ट्रांझिट रिमांड ( Sant Kalicharan Transit Remand ) मिळाला आहे. कालीचरणला आता 6 जानेवारी रोजी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला होता. खासदार, आमदार, मंत्री आणि पंतप्रधान यांनी कट्टर हिंदुत्ववादी होण्याची गरज आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी जातिव्यवस्था रद्द करायला हवी. महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये घराणेशाही वाढवण्याचे काम केले. पंडित नेहरूंऐवजी सरदार पटेल यांच्याकडे सत्ता सोपवली असती तर देश अमेरिकेच्या पुढे गेला असता. 'देश सोने की चिडिया राहिला असता', असे वक्तव्य कालीचरणने केले होते. महात्मा गांधी हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे जनक आहेत. ते राष्ट्रवादाचे जनक नाहीत, म्हणून ते त्यांना राष्ट्रपिता मानत नाही, असे तो म्हणाला होता. यानंतर पुन्हा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ टाकून कालीचरणने आगीत तेल ओतण्याचे काम केले. गांधींना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्याचा पश्चाताप नाही. मी गांधींचा तिरस्कार करतो. गांधींनी हिंदूंसाठी काय केले?, असे कालीचरण म्हणाला होता. यानंतर विविध स्तरामधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -Bulli Bai App Case : बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील आरोपी महिला पोलीसांच्या ताब्यात

Last Updated : Jan 4, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details