डेहराडून - महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी नैनीतालच्या हल्दानीमधून एका दाम्पत्याला अटक केली आहे. या दाम्पत्यावर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये कलम 376, 406, 420 आणि 406 आयपीसी अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. तसेच आरोपी पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे. पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस संबंधित दाम्पत्याला नागपूरला घेऊन आले आहे.
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; उत्तराखंडमधून केलं आरोपींना अटक - नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर पोलिसांनी नैनीतालच्या हल्दानीमधून एका दाम्पत्याला अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस संबंधित दाम्पत्याला नागपूरला घेऊन आले आहे.
पिथौरागढ निवासी पंकज पटियाल हा आपली पत्नीसोबत नागपूरमधील एका हॉटेलमध्ये व्यवसाय करत होता. पंकजने स्थानिक महिलेसोबत व्यवसायीक भागीदारी केली होती. पंकजवर संबंधित महिलेला धोका दिल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित महिलेसोबत पंकजने शाररीक संबंध प्रस्थापित केले होते. या दाम्पत्याविरोधात नागपूर पोलीस स्थानकात 2 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता, असे हल्द्वानी पोलीस निरक्षक जगदीश चंद्र यांनी सांगितले.
संबंधित दाम्पत्य नैनीतालला फरार झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी नैनीताल गाठले आणि त्यांना अटक केली.