मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आज विसर्जनाच्या दिवशी शेवटची आरती करून बाप्पाला निरोप देण्याच्या तयारीत असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या पंडालावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.ही बाब अत्यंत गंभीर असून या आधी अनेकदा याबाबत प्रशासनाला जाब महासभेत विचारला गेला आहे मात्र प्रशासनाची बोट चेपी भूमिका नागरिकांच्या जीवावर उठत आहे .
Breaking News Live : ठाण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पंडालावर झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी - Mumbai Rains
22:55 September 09
ठाण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पंडालावर झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
22:54 September 09
मुंबईत नवीन २५१ कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून आज ( शुक्रवारी ) २५१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २०८५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत आज ९ सप्टेंबरला १०,८०७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २५१ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. ४०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४७ हजार ५८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २५ हजार ७८० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०८५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २५३४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२८ टक्के इतका आहे.
22:53 September 09
श्रीलंकेने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय
दुबईतील सुपर 4 च्या 6 व्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवला. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
22:43 September 09
पुण्यात मानाच्या गणपतीचे तब्बल 10 तास हून अधिक विसर्जन
पुणे:- गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. दरवर्षी मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन हे आठ वाजल्याच्या आत होत असतात यंदा मात्र दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला असून तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक चालली.
22:28 September 09
श्रॉफ बिल्डिंगची अनोखी पुष्पवृष्टी माऊलींच्या पालखीचा साकारलाय देखावा
मुंबई : लालबाग म्हणजे बाप्पांची पंढरी सध्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दुमदुमून गेली आहे. गणेशोत्सवात लालबाग परिसराचं खास आकर्षण असतं आज दहाव्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांचा मोठा जनसागर लालबाग परिसरात लोटला आहे. या लालबाग मधील विशेष आकर्षण असते ते श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी.Body:या पुष्पवृष्टीचे खास वैशिष्ट्य असते ते म्हणजे आध्यात्मिक आणि पौराणिक क असा आगळावेगळा देखावा साकारून त्यातून गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक बापावर बिल्डिंग तर्फे पुष्पवृष्टी केली जाते.
22:27 September 09
लालबागच्या राजाला मुंबई अग्निशमन दलाने भायखळा येथे सायरन वाजून दिली सलामी
लालबागच्या राजाला मुंबई अग्निशमन दलाने भायखळा येथे सायरन वाजून सलामी दिली.
22:25 September 09
गिरगाव चौपाटी समोर वाहतुक खोळंबली
गणेश विसर्जनासाठी चारही दिशेने गिरगाव चौपाटीवर जनता येत आहे.जनांचा प्रवाह येतो आहे जातो आहे . आणि नेमक्या सिग्नल जवळ गाड्या थांबल्या की जनांचा प्रवाह तेवढ्यातून रस्ता पार करतो . मात्र गर्दी अलोट असल्यामुळे सिग्नल जरी हिरवा दिसला तरीही जनता रस्ता पार करत असते त्याच्यामुळे चार चाकी वाहन यांना थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे या परिसरात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.
आज पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असूनही अखेर अलोट गर्दीमुळे वाहतूक खोळंबली .नरिमन पॉईंट कडे जाणाऱ्या आणि तिकडनं पुन्हा माघारी येणाऱ्या चार चाकी वाहनांना या अलोट गर्दीचा प्रचंड फटका बसला .सिग्नल वरील सिग्नल कोणताही असो मात्र अलोट गर्दी पुढे चार चाकी वाहन चालकांचे काहीही चालले नाही. पोलीस अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र जनतेची गर्दी एवढी प्रचंड आहे की या महासागराला झोपवणे कोणाच्याही हातात नाही ;अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. वाहतूक पोलीस यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की," माणसं प्रचंड संख्येने येत आहेत त्या तुलनेमध्ये आमचे मनुष्यबळ काय करू शकता प्रत्येकाला विनंती करणं हाच उपाय आहे शेवटी आम्हीही माणूस आहोत
18:38 September 09
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोव्यात मडगाव येथे घेतली भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसला सुरुवात केली आहे. आज दुपारी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दक्षिण गोव्यातील मडगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांशी महत्त्वाची बैठक घेऊन दक्षिण गोवा मतदार संघातील तयारी विषयी आढावा घेतला.
18:10 September 09
याकुब मेमनची कबर बांधण्यासाठी कोणाच्या कार्यकाळात परवानगी मिळाली? जयंत पाटील यांचा सवाल
याकुब मेमनची कबर बांधण्यासाठी कोणाच्या कार्यकाळात परवानगी मिळाली हे पाहणे महत्त्वाचे आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रातही भाजपची सत्ता असताना त्यांची कबर बांधण्यात आली. याला ते (भाजप) जबाबदार आहेत: याकुब मेमनच्या गंभीर वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोप केला आहे.
17:37 September 09
सायरस मिस्त्रींच्या कार अपघातानंतर FADA राबविणार सुरक्षा मोहिम
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. यानंतर संबंधित अपघाताची चौकशी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. सध्या याची चौकशी सुरु आहे. अशातच आता या जीवघेण्या अपघातानंतर चूकीच्या कार मालकांना पकडण्यासाठी FADA ( फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ) सुरक्षा मोहीम राबवणार आहे.
16:58 September 09
मुंबईत दहा दिवसाच्या बाप्पाला मनोभावे निरोप; जुहू बीचवर विसर्जनाची धूम
मुंबईत दहा दिवसाच्या बाप्पाला मनोभावे निरोप दिल्या जात आहे. अशातच मुंबईतील जुहू बीचवर विसर्जनाची लगबग पाहायला मिळत आहे.
15:44 September 09
नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली
मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुरूप शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही सूचना केली आहे.
15:11 September 09
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर भारताकडून शोक; 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल गुरुवारी निधन झाले. 96 वर्षीय राणी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून अनेक आजारातून बऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर विविध देशांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही शोक व्यक्त करत 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
14:55 September 09
पत्रकार सिद्दीकी कप्पनला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
युएपीए कायद्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सिद्दीकी कप्पन हे हाथरस येथील बलात्कार हत्येच्या घटनेच्या वार्तांकनासाठी उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. जवळपास 23 महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची वाट मोकळी झाली आहे.
13:04 September 09
याकूब मेमनच्या स्मारकासाठी कब्रस्तान ट्रस्टला अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनची धमकी
याकूब मेमन कबरीवर रोषणाई करण्याचा वाद शांत होत असतानाच आता या संदर्भातील एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. याकूब मेमनचं स्मारक करण्यासाठी कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित सदस्याला अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनने धमकी don Tiger Memon threatens Kabrastan Trust for Monument Yakub Memon दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रस्टच्या सदस्याला धमकी आल्याचे सदस्याकडून पोलिसांत माहिती दिली आहे. ट्रस्टशी संबंधित नवांगी नावाच्या व्यक्तीला ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे
12:43 September 09
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर; बाप्पाचं घेतलं दर्शन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
08:41 September 09
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्त.. भाविकांची मोठी गर्दी
मुंबई : गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना झाला आहे. आता साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या राजाची आरती संपन्न झाली आणि त्यानंतर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात फिरकणाऱ्या तरुणांच्या जल्लोषात मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून बाहेर पडली आहे.
07:57 September 09
एकनाथ शिंदेंनंतर आता उद्धव ठाकरेंच्या बॅनरवरही झळकले आनंद दिघे.. पुण्यात लागले बॅनर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंतर आता उध्दव ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांचा फोटो वापरत "माझा कट्टर शिवसैनिक " आनंद दिघे" असा बॅनर पुण्यात झळकला आहे. त्याची आता चर्चा होऊ लागली आहे
07:54 September 09
अमरावती गणपती विसर्जनाला सुरुवात
दहा दिवस उत्साहात साजरा झालेला गणेशोत्सवानंतर आज अमरावती शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. काही महिन्यात जिल्ह्याची परिस्थिती पाहता गणपती विसर्जनादरम्यान कुठलीही विघ्न येऊ नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचा कडे कोर्ट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
07:48 September 09
आज अनंत चतुर्दशी.. गणरायाला भक्त देणार निरोप.. मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत जवळपास 3200 पोलीस अधिकारी, 15500 पोलीस कर्मचारी, 8 एसआरपीएफच्या कंपनी एक रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी आणि एक फोर्स वनची तुकडी तैनात असणार आहे. त्याचप्रमाणे 750 होमगार्ड 250 ट्रेनिंग देखील मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी आज मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे. त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलीस सुद्धा कार्यरत असणार आहेत. दहशतवादी विरोधी पथकाचे पथक देखील गुप्तपणे सक्रिय असणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
07:05 September 09
ठाण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पंडालावर झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम काम करत आहेत: डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप छान काम करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, माझ्या अध्यक्षपदाच्या काळात भारताचा माझ्यापेक्षा चांगला मित्र कधीच झाला नाही.