महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Winter Session 2022 : लोकसभेत महाराष्ट्र; खासदारांनी मांडले स्थानिक मुद्दे, पाहा, कोण काय म्हणाले... - Maharashtra MPs raised issues in Loksabha

सध्या नवी दिल्लीत लोकसभेचे हिवाळी अधिवेशन (Loksabha Winter Session 2022) सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध (Maharashtra MP in Loksabha) खासदारांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या स्थानिक मतदारसंघातील प्रश्न यावेळी संसदेत उपस्थित केले आहेत. विविध मुद्द्यांवरून सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Loksabha Rajyasabha Winter Session 2022) गाजत आहे.

Winter Session 2022
लोकसभा हिवाळी अधिवेशन 2022

By

Published : Dec 15, 2022, 4:42 PM IST

लोकसभा हिवाळी अधिवेशन 2022 मध्ये महाराष्ट्राच्या खासदारांनी मुद्दे मांडले

नवी दिल्ली :संसदेत चालू हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार गोपाल शेट्टी, खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मुद्दे मांडले. (Winter Session 2022) (Maharashtra MPs raised issues in Loksabha)

लोकसभेत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी धनगर समाजा विषयी मुद्दे मांडले. ते म्हणाले की, अनुसुचित जमातींच्या यादीत 36 व्या क्रमांकावर 'धनगड' नावाच्या जातीचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रात अशा नावाची कोणतीच जात अस्तित्वात नाही. यादीत 'धनगर'च्या जागी 'धनगड' झाले आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी डिक्लेरेशन दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी त्यांच्या मतदारसंघात रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. महास्वामी म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात होते. येथील ज्वारी आणि डाळिंबांची विदेशातही निर्यात होते. त्यामुळे सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी ज्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल देशातील इतर भागात विकण्यास मदत होईल".

मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघात सर्व औपचारिकता पूर्ण होऊन देखील गार्डन, बगिचा किंवा खेळाचे मैदान यांचा विकास झाल नाही, यावरून आपली व्यथा संसदेत मांडली. या प्रकरणी गेल्या आठ वर्षांपासून सतत पत्रव्यवहार करूनही संबंधित मागण्यांवर काहीच हालचाल केली गेली नाही असे गोपाळ शेट्टी म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लोकसभेत धनगर समाजाला अनुसुचित जातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी मराठा समाज, मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज यांच्याप्रमाणेच धनगर समाजानेही आरक्षणात बदलाव करण्याची मागणी केली असल्याचे लोकसभेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details