नवी दिल्ली -संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सीडीएस जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी, जवान यांचे निधन झाले. त्यांना आज लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबाबत लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले.