'लस खरेदीसाठी जागतिक निविदा' संदर्भात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत प्रश्न मांडला. सर्व राज्यांनी लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या. मात्र, केंद्र सरकारने पाठिंबा न दिल्याने त्या अयशस्वी ठरल्या. त्यामुळे सरकारने लस खरेदीच्या जागतिक निविदेसाठी केंद्र सरकारने एकसमान धोरण मसुदा (युनिफॉर्म पॉलिसी ड्राफ्ट) तयार करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
12:43 July 23
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 'लस खरेदीसाठी जागतिक निविदा' संदर्भातील समस्या मांडल्या.
12:31 July 23
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केले.
किनारी नियमन क्षेत्र अधिसूचनासंदर्भात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी लोकसभेत प्रश्न मांडले. महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी आरे ऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती. मात्र, केंद्र सरकारनं ही जामीन केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भातील प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केले.
11:41 July 23
संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. या अधिवेशनात संसदेची एकूण 19 सत्रे होत असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश आहे. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल. दरम्यान, विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे.