नवी दिल्ली :महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद काही केल्या ( Maharashtra Karnataka Border issue ) सुटलेला नाही. उलट दोन्ही राज्यांत तणााची स्थिती आहे. महाराष्ट्राचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Narendra Modi will solve border issues ) यांना भेटणार आहेत. आज ते या संदर्भात भाजप खासदारांशी चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांतील सीमावादाचा तिढा सोडविण्यासाठी पंतप्रधान काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
पंतप्रधान मोदींची खासदारांशी चर्चा :आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्ये यावर भाजप खासदार गाऱ्हाणे मांडणार असल्याची माहिती आहे. दोन्ही राज्यातील सीमावाद थांबवण्यासाठीपंतप्रधान मोदींकडून प्रयत्नकरण्यात येत आहेत. सीमाभागातील नागरिकांचे प्रश्न सेडवण्यासाठी नरेंद्र मोदींकडून स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या दरम्यान दोन्ही राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये संवाद, चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघेल अशी शक्यता वर्तवण्यात ( Communication between political leaders ) येत आहे.
दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या भेटी :कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची 4 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे बैठक झाली होती. ही एक अनौपचारिक बैठक होती. ही मिटींग सीमावर्ती जिल्ह्यांतील पायाभूत सुविधा आणि त्यांचे प्रश्न यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली हती. अलीकडच्या काही वर्षांत दोन्ही राज्यांमध्ये सीमा आणि भाषेच्या मुद्द्यांवरून अनेकदा वाद निर्माण होत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेळगावच्या महाराष्ट्रात विलीनीकरणासह सीमाप्रश्न वारंवार मांडले होते.
वाहनांवर दगडफेक : बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. त्याला प्रत्य़ुत्तर म्हणून पुण्यात आणि औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासले. . कर्नाटकच्या गाड्यांवर जय महाराष्ट्र ( Jai Maharashtra on Karnataka bus ) लिहत कर्नाटकच्या नावावर काळे फासण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी ( Strong slogans against Karnataka government ) केली. कर्नाटकातून औरंगाबादेत नऊ बस मध्यवर्ती बस स्थानकात मुक्कामी आल्या होत्या. त्यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे माहिती देण्यात आली होती. सीमा वादाच्या अनुषंगाने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासण्याच्या घटना मंगळवारी घडली.
सीमा वादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात : विधानसभा मतदार संघातून बेळगाव, खानापूर सह आजूबाजूच्या प्रदेशात समिति मर्यादित राहिली. 2004 साली सीमा वादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ( Maharashtra Karnataka border dispute issue in SC ) गेला. समितीचे दोन आमदार त्यावेळी निवडून आले, पण प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेला. हे निमित्त घेऊन इतर पक्षांनी राजकारण करायला सुरुवात केली. 2008 मध्ये समितीचा फक्त एकच आमदार निवडून आला. आता समिती संपल्याच्या चर्चा झडायला लागली. मात्र, 1 नोव्हेंबर 2011 ला बेळगावचे महापौर, उपमहापौर झाले. त्यामुळे कर्नाटक सरकारने थेट बेळगाव महानगरपालिका बरखास्त करुन महाराष्ट्र एकीकरण समितीला आव्हान दिले. 2018 साली किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहर एकीकरण समिती, दीपक दळवींचे नेतृत्वात मध्यवर्ती एकीकरण समिती अशी उभी फुट पडली. महाराष्ट्र एकीकरण समितीवर याचा परिणाम झाला. त्यावेळी एकही आमदार निवडून आला नाही.