नवी दिल्ली: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच कालावधीत गुन्ह्यांच्या संख्येत देशाच्या आर्थिक राजधानी पाठोपाठ उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे झाले आहेत. आयपीसी गुन्ह्यांच्या बाबतीत तिसरे राज्य तामिळनाडू ठरले आहे.
मात्र, तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. संख्येच्या बाबतीत, 2020 ते 2021 पर्यंत तामिळनाडूमधील IPC गुन्ह्यांमध्ये निम्म्याने घट झाली आहे. दरम्यान, दिल्ली सर्वात वाईट कामगिरी करणारा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आहे.
सिक्कीम हे भारतीय दंड संहितेअंतर्गत एकूण 532 गुन्ह्यांसह सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आहे. त्यापाठोपाठ ईशान्येतील सात राज्यांपैकी दुसरे राज्य नागालँड आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गोवा आहे.
2020 ते 2021 दरम्यान दिल्ली शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. अहवालानुसार, 19 महानगरांपैकी राष्ट्रीय राजधानीत आयपीसी गुन्ह्यांच्या बाबतीत सर्वात वाईट रेकॉर्ड आहे. या 19 महानगरांमधील सर्व आयपीसी गुन्ह्यांपैकी 45% गुन्ह्यांचा वाटा आहे. महाराष्ट्रात सर्वात अधिक रेकॉर्ड आहे, तर राजधानी मुंबई, देशातील आयपीसी गुन्ह्यांच्या संख्येत दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नंबर गुन्ह्यांच्या प्रकरणांच्या संख्येत दिल्ली आणि मुंबईनंतर लागतो आहे. तथापि, तामिळनाडूप्रमाणेच प्रकरणांची संख्या मात्र निम्म्यावर आली आहे.
हेही वाचा - POCSO CASE जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केला सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक