महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News : आज केसीआर मुंबईत; पंजाब, उत्तर प्रदेशात मतदान यासह वाचा महत्त्वाच्या टॉप न्यूज एका क्लिकवर - Third Front Movements

Todays Top News : आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
केसीआर आज मुंबईत

By

Published : Feb 20, 2022, 6:12 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सविस्तर वाचा...
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ओडिशा दौऱ्यावर आहेत. ते पुरी येथील गौडिया मठ आणि मिशनचे संस्थापक श्रीमद सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांच्या 150 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत.
  • पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान होणार आहे. सविस्तर वाचा...
  • शोपियाँमध्ये चकमकीत वीरमरण आलेल्या सांगलीतील जवान रोमित चव्हाण यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सविस्तर वाचा...

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई :मुंबई पोलीस दलातील अधिकारी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर देखील अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाल्यानंतर पोलीस विभाग बदनाम झाले होते नंतर पोलिस विभागाने स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. सविस्तर वाचा...
  • बारामती (पुणे) -एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू (ST Workers Strike) आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजूबाजूच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आपल्याही कर्मचाऱ्यांना आणले आहे. पूर्वी त्यांचे वेतन जरूर कमी होते. सध्या याबाबतचा निर्णय न्यायालयात आहे. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. गरिबांना परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते. याचा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) केले. सविस्तर वाचा...
  • जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) हे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढा देत असताना जवान रोमित यांना वीरमरण आले.सविस्तर वाचा...
  • मुंबई:दाऊदभारतात घातपात घडवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केली आहे. एवढेच नाही तर स्फोटके आणि घातक शस्त्रास्त्रांंच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागात हिंसाचार घडवण्याची योजना दाऊदने आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सविस्तर वाचा...
  • नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेच्या ( National Investigation Agency ) प्रवक्त्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की माजी पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी ( IPS officer Arvind Digvijay Neg ) यांना अटक करण्यात आली आहे. काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.सविस्तर वाचा...
  • हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ( South Africa test series )पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार, याबाबत क्रिकेट वर्तूळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. अखेर त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली ( Rohit Sharma Test Team Captain ) आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details